पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रकार २ : स्वतःशी निःशब्द संभाषण :
 नकारात्मक विचार हे नेहमीच ताण, भीती, उलघाल निर्माण करत असतात. विचारांचे स्वरूप म्हणजेच एक प्रकारे भावभावना. आपण नकारात्मक विचार करू तर त्रासदायक भावना निर्माण होतील. सकारात्मक विचार आनंददायी भावना निर्माण करतील..हे जे निःशब्द संभाषण आपण आपल्याशीच करत असतो, त्या सकारात्मक बाजूला आपण मानसिक खात्रीची जोड देणे जरूर असते. हे विचार समजा आपण लिहून काढले व ते मोठ्याने किंवा मनातल्या मनात वाचत राहिलो तर त्याचा सुपरिमाण होणारच. एखादी असत्य कहाणी जर सातत्याने सांगत राहिले तर अंती ती सत्य वाढू लागते. मग मुळातच सत्य, श्रेयस्कर, असे विचार आपण शब्दबद्ध करून आपणास ऐकवत राहिलो तर त्याचा कल्पनेपलीकडे सुपरिणाम होतो, असा अनेकांचा अनुभव आहे.
 प्रकार ३ : ध्यान :

 'इमेजरी' च्या प्रवर्तक त्रयीच्या मताप्रमाणे 'ध्यानात कोठलीही गोष्ट मुद्दाम करावी लागत नाही, तसेच त्याला एखादा निश्चित उद्देश नसल्यामुळे नुसते ध्यान शरीराचा ताण घालवेलच असे निश्चित सांगता येणार नाही. यात कोठलीही शारीरिक हालचाल नसते. परंतु सूफी पंथांचे अनुयायी जे नृत्य करतात त्यात खूपच शारीरिक हालचाल करावी लागते व त्यामुळे त्यासाठी खूप शारीरिक शक्ती खर्ची पडते. ताणतणावांमधून जी रसायने शरीरात निर्माण होतात ती या वेगवान शारीरिक हालचालीमुळे नष्ट होत असतात व त्यामुळे शरीर ताणरहित होण्यास मदत होते. ध्यानपद्धतीत शरीर स्थिर असते, हालचाल करावी लागत नाही तरीही मन शांत व स्वस्थ होत असते, पण निश्चिती नाही. काही पाश्चात्य विद्वानांनी याला 'पुनर्गृह प्रवेश' (Coming Home) असे म्हटले आहे. (अत्यंत निर्विकार ध्यानामुळे सुद्धा शरीर ताणरहित हाते). ताणामध्ये 'ॲड्रेनलिन' साव वाढलेले असतात ते पूर्ववत सामान्य पातळीवर येतात, नाडीची गती कमी होते, श्वास- प्रश्वास मंद होतो, चयापचयाच्या वेगात कमी येते व रक्तातील लॅक्टेटचे प्रमाण वाढलेले असल्यास ते खाली येते (हे जास्त असेल तर अकस्मात उद्भवणाऱ्या भयगंडाचा झटका येतो), एकूण ऑक्सिजन कमी लागतो, मनाची सावधानता,

२८३