पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुवर्णपरिमाणाची अनुमानें

६५

कागदी चलननिधी व सुवर्णपरिमाणानिधी पत्रकांवरून
निघणारी अनुमानें
सुवर्ण संचयांत वाढ

 कागदी चलननिधीमध्ये १९१४ मार्च अखेर, इंग्लंडमध्ये रोख सोनें व स्टर्लिंग रोखे मिळून १३ कोटिं १५ लक्ष रुपयांचे व हिंदुस्थानांत २२ कोटि ४४ लक्ष रुपयांचे सोनें होतें तें १९२० जानेवारीमध्ये इंग्लंडमध्यें ९४ कोटि १२ लक्ष व हिंदुस्थानांत ३५ कोटि १० लक्ष रुपयांचे इतकें वाढलें, हें आपणांस कागदी चलननिधी वें पत्रक मागें दिलें आहे, त्यावरून दिसून येईल. या सहा वर्षांत इंग्लंडमध्ये सुमारे ७५ कोटि रुपयांनी व हिंदुस्थानांत सुमारे १२॥ कोटि रुपयांनी सोन्याची वाढ झाली ती कां झाली हें आतां आपण पाहूं.
 महायुद्धामुळे ह्या देशांतून बाहेर माल फार गेला, त्या मानानें आयात मात्र झाली नाहीं. सबब हिंदुस्थान धनकोच्या स्थितीत होते, म्हणून या देशांत पुष्कळ सोने यावयास पाहिजे होतें. पण त्यावेळी सोन्याच्या निर्गती- वर इंग्लंडमध्यें सरकारी निर्बंध असल्यामुळे, बरेंच सोनें स्टेट सेक्रेटरी जवळ इंग्लंडमध्ये राहिले, तेथील ऋणको व्यापान्यांनीं स्टेट सेक्रेटरीकडे सोनें दिलें व हिंदुस्थान सरकारवर रुपयाच्या हुंड्या घेतल्या व त्या हिंदुस्थानांतील घनको व्यापान्यांकडे पाठवून देऊन आपले देणें वारले. येथील व्यापान्यांनी हिंदुस्थान सरकारकडे त्या वटविण्याकरितां पाठविल्या, व सरकारनी जास्त कागदी चलन व रुपये काढून सदर हुंड्या वटविल्या. स्टेट सेक्रेटरीजवळ सांच- लेल्या सोन्याचे व स्टर्लिंग रोख्याचे आधारावर हिंदुस्थान सरकारने हैं वाढते चलन प्रसृत केलें.
 हिंदुस्थानसरकारास प्रतिवर्षी देणें असलेली होमचार्जेसबद्दलची रक्कम वजा जातां वरीलप्रमाणें ६ वर्षांत सुमारे ७५ कोटि रुपयाचे सुवर्णाची, सदर निधीच्या इंग्लंडमधील विभागांत भर पडली.
 हिं...५