पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

कोणासही वाटेल त्यावेळी देशांतील धातूंच्या चलनांत रूपांतरित करण्यास अडचण पडणार नाहीं इतके धातूंचे चलन प्रचारांत ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे, म्हणजे भागतें. राष्ट्रीय बँका हें कार्य करतात.

" मध्यवर्ती बँका "

 "कागदी चलन" प्रचारांत कसे आले याचा विचार करतांना, बँकांची चलनपद्धतीत उपयुक्तता किती आहे याचा विचार करणें अत्यंत अगत्याचें आहे म्हणून आपण आतां तिकडे वळू.
 मध्यवर्ती बँक : - देशांतील कागदी चलनाचें, व्यापार व उद्योगधंद्यांच्या जरूरीप्रमाणें प्रसरण व आकुंचन करणें, व्यापारी कर्जाचा दर ( Bank rate ) ठरविणें, परराष्ट्रीय हुंडणावळ स्थिर राखणे, आणि देशांतील इतर बँकांना जरूर तेव्हां मदत करणे, ही कामे पार पाडण्याची जबाबदारी ज्या बँकेवर असते तिला मध्यवर्ती बँक असें म्हणतात. ( बहुतेक देशांतील मध्यवर्ती बँका खाजगी भांडवलावर उभारलेल्या असतात. तरी राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून तिच्यावर लद्देशीय सरकारचें नियंत्रण असतें. )
 प्रत्येक सुधारलेल्या देशामध्ये बँकांचा प्रसार पुष्कळच झालेला असतो. प्रत्येक बँकेस तिच्याजवळ ज्या प्रमाणांत ठेवी असतील, त्या मानानें कांहीं रक्कम रोकड ठेवावी लागते; व कांहीं रक्कम केव्हांही उभी करतां येईल, अशा रीतीने गुंतवावी लागते; तथापि अडीअडचणीचे वेळीं अगदीं सुस्थिती- मध्ये असलेल्या बँकेसही जरूर तेवढी रक्कम उभी करणे कठीण जाईल. प्रत्येक बँकेसाठी स्वतंत्र रीतीनें आपापली व्यवस्था करण्यासाठी बरीच रक्कम केवळ केव्हांतरी जरूर पडल्यास उपयोगी पडावी म्हणून कुलुपांत ठेवावी लागते. जर सर्व बँकांनी आपल्या देणे असलेल्या रकमेच्या काही ठराविक अंशा- इतकी रक्कम एका मध्यवर्ती बँकेकडे ठेविली, तर त्या बँकेजवळ बरीच मोठी रक्कम जमून तिचा विनियोग कोणत्याहि गरजू बँकेस तात्कालिक मदत देण्याकडे करितां येईल; व त्याप्रमाणेंच इतर बँकांचेजवळ अल्प मुदतीच्या हुंड्या असतील तर त्यांचेबद्दलही योग्य व्याज कापून घेऊन रकमा आदा येतील, अशा रीतीनें एक राष्ट्रीय मध्यवर्ती गंगाजळी निर्माण होऊन