पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मध्यवर्ती बँका

१५

चलनाची बचत होऊन जरूर तेव्हां मध्यवर्ती बँकेकडून इतर बँकांना मदत मिळते.
 शिवाय नाण्यांच्या ऐवजी कागदी चलन वापरणें लोकांस जास्त सोईचें वाटते, तसेंच तें चलन काढणें बँकास फायद्याचें असतें. नाण्याच्या ऐवजीं कागदाचा तुकडा गिन्हाइकांस देणें म्हणजे तितक्या रकमेवरील व्याज फुकट मिळविणे, व त्या रकमेनें खेळतें चलन वाढविणें होय. जसजसे व्यापार, व उद्योगधंदे वाढतात, तसतसें या वाढलेल्या व्यवहारास पुरेल इतकें चलन पुरवठ्यास येत नाहींसें होतें. यासाठी धातूचें चलनाची बचत व्हावी म्हणूनही नोटा काढण्यांत येतात. सुरवातीस सर्वच बँका नोटा काढीत असत, व अशा रीतीनें त्यांचेजवळ ठेवींच्या रूपाने असलेल्या रकमेपेक्षां कितीतरी जास्त रक्कम नोटांचे स्वरूपांत बाजारांत खेळती राहूं लागली. बँकेकडे असलेल्या सर्वच ठेवींना एकदम मागणी येत नाहीं. ह्या अनुभवा वरून ठेवींच्या रकमेपेक्षां जास्त रकमांच्या नोटा काढतां येतात. सर्वच बँकांना नोटा काढणेचा हक्क असल्यास बराच घोटाळा माजतो ( इंग्लंडमध्ये १८४४ सालचे सुमारास अनेक बँका नोटा अधिक वाढून त्यास तारण कमी ठेवल्यामुळे बुडाल्या ) असे दिसून आल्यावरून हल्ली बहुतेक देशांत नोटा काढणेचा हक्क फक्त राष्ट्रांतील मध्यवर्ती बँकेसच असतो.
 केवळ नाणें वापरणेस गैरसोयीचें म्हणून तें गंगाजळीत ठेऊन त्याच्या किंमतीच्या नोटा काढण्याने सोन्याची किंवा चांदीची बचत मुळींच होत नाहीं. उलटपक्षीं जरूर तेवढे राखीव सोनें शिल्लक ठेवून वाढत्या व्यापारास लागणारें चलन पुरवितां येण्याची नोटा काढण्यापासून चांगलीच सोय होऊं शकते. मात्र नोटांच्या रकमेचा ठराविक अंश रोख सोन्याच्या किंवा नाण्यांच्या रूपानें शिल्लक पाहिजे.
 अशा रीतीनं मध्यवर्ती बँकेचें कार्य दोन प्रकारचें असतें, तिचा एक उपयोग देशांतील बँकांची बँक ह्या नात्याने होतो व दुसरें कार्य म्हणजे देशांतील व्यापारी व औद्योगिक घड मोडीत लागणारें चल व्यव. स्थित रीतीनें व जरुरीप्रमाणे योग्य प्रमाणांत समाजांत खेळविणें हें होय, होन का वेगवेगळ्या स्वरूपाची असली, तरी ती एकाव