पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कागदी चलन

आपणास हिंदुस्थानच्या चलनपद्धतीचा विचार करतांना उत्तम रीतीनें दिसून येईल.

कागदी चलन

 आपण हें पाहिलेंच आहे कीं, विनिमयाचे सर्वमान्य साधन म्हणजे चलन, आणि तें दुसन्यास देऊन त्याच्या मोबदला आपणास हव्या अस- लेल्या जिनसा घेणे हाच त्याचा उपयोग. सरकारी शिक्क्यानें चलनास सार्व- त्रिक मान्यता प्राप्त होते; व लोकांचा त्यावर विश्वास बसतो. कायद्याचा अधिकार व लोकांचा विश्वास ह्यांच्या जोरावर समाजांत चलन खेळतें, आणि अगदी सूक्ष्म दृष्टीने पाहतां नाण्याच्या स्वरूपांतील पैसाहि तिकिटा- सारखाच आहे. त्यास अंगची अशी कांही किंमत नसली तरी हरकत नाहीं. कारण त्याचें कार्य देवघेवीचें साधन होणें एवढेच आहे. कापड मोजण्याचा गज चांदीचा असला काय, किंवा लांकडाच्या पट्टीचा असला काय, लांबी मोजण्याचें काम दोघांकडूनही सारखेच होतें. चलन हैं पदार्थाचे मोल मोजण्याचें माप आहे. परंतु पैशाचा पुरवठा वाढला असतां त्याचे मोल म्हणजे पदार्थ विकत घेणेचें सामर्थ्य कमी होतें. म्हणजेच बाजारभाव चढतात. ह्याच्या उलट चलनाचा पुरवठा कमी असतां त्याचें मोल वाढते आणि बाजारभाव उतरतात. चलन हें केवळ विनिमय साधन आहे; तें कांहीं साध्य नव्हें. तथापि सामान्यतः पदार्थ विकत घेण्याच्या साधनासही अंगची किंमत असावी असे लोकांस वाटणें सहाजिक आहे. नाणी जवळ बाळगण्याची व पुढच्या उपयोगासाठीं गांठी ठेवण्याची अवश्यकता आर्थिक प्रगतीबरोबर कमी कमी होत जाऊन लोकांस चलनाच्या खऱ्या स्वरूपाची ओळख पटू लागली. चलनाचा वास्त- विक उपयोग तें दुसन्यास देता यावें, खर्चता यावे हा आहे. म्हणूनच चांदी, सोन्यासारख्या मौल्यवान वस्तूंच्या ऐवजीं कागदाचा उपयोग कर- ण्यांत समाजाचा फायदा असून सोईस्करही आहे, असे दिसून आल्यामुळे 'कागदी चलन' प्रचारांत आले. मात्र नोटावर दर्शित केलेली रक्कम माग तांच मिळेल असा लोकांचा विश्वास बसण्याकरितां सदर कागदी चलन