पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

जर्मनीनेंहि सुवर्णचलन सुरू केले,त्यामुळे चांदीस मागणी कमी झाली.त्यामुळे फ्रान्सच्या चलनपद्धतीत बराच घोंटाळा माजू लागला म्हणून फ्रान्सनेही १८७४ मध्ये सुवर्णचलन सुरू केले. याचा परिणाम चांदाचा भाव आणखी उतरण्यांत झाला, व याच सुमारास रुप्याच्या खाणी अधिक सांपडून त्यांतून चांदीची पैदास जास्त होऊ लागली, व वरील देशांनी सुवर्णचलन सुरू केल्यामुळे सोन्याचा भाव चढू लागला, यामुळे सोन्याचांदीचे पूर्वीचे १ तोळा सोन्यास १५ तोळे चांदी हे प्रमाण न टिकतां ते १ तोळा सोन्यास २३ तोळे चांदी येथपर्यंत गेल्यामुळे, हळुहळू लॅटिन-युनियनपैकी डेनमार्क, स्वीडन, नॉर्वे, हॉलंड, इटली, स्वित्सलँड वगैरे देशांनीही सुवर्ण चलनच सुरू केले, त्यामुळे चांदास दुय्यमपणा आला; व द्विचलनपद्धतीचा बोजवारा उडाला. सन १९३१ च्या मध्यापर्यंत चीनखेरीज जगांतील बहुतेक राष्ट्रांनी मुख्य कायदेशीर चलन म्हणून सोन्याचाच उपयोग केला होता.

"निर्दोष चलनपद्धति"

 विनिमयाचे सर्वमान्य साधन म्हणजे चलन; आणि ते दुसन्यास देऊन त्याचा मोबदला आपणांस हव्या असलेल्या जिनसा घेणे हाच त्याचा मुख्य उपयोग, सरकारी शिक्क्याने चलनास सार्वत्रिक मान्यता प्राप्त होते; व लोकांचा त्यावर विश्वास बसतो. म्हणून कायद्याने केवळ अमक्या नाण्यांची किंमत अमूक आहे, असे म्हणून भागणार नाहीं. नाण्याची कायदेशीर किंमत व नाण्यामध्ये वापरलेल्या धातूची किंमत ( Intrinsic Value of the metal ) ही जर एकच असतील, तर ती नाण्याची पद्धत निर्दोष व विशेष श्रेयस्कर आहे, असे मानण्यात येते.
 नाण्यावर मारलेल्या किंमतीच्या शिळ्यापेक्षा त्यांतील धातूची किंमत कमी असेल, तर त्या नाण्यावर असलेल्या किंमतीच्या शिक्कयानुसार त्याचा देशांतले देशांत त्या किंमतीप्रमाणे व्यवहारही होईल, परंतु केवळ एका धातूचा तुकडा या दृष्टीने जगाचे बाजारात त्याची किंमत त्या धातूच्या तितक्याच वजनाच्या तुकड्याएवढाच होईल, व यामुळे परदेशच्या देवघेवत अडचण पडून कित्येक वेळां नुकसानही सोसावे लागेल; ते कसे हैं