पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदी चलन पद्धतीचा इतिहास

असा आहे. मनुष्याच्या नानाविध गरजा भागविण्याकरितां त्या संपत्तीस मागणी निर्माण होते व संपत्ति आणि मनुष्याच्या नानाविध गरजा यांचा मेळ चलनद्वारे बसतो. तेव्हां चलन म्हणजे मनुष्याच्या गरजा भागविण्याचें सामर्थ्य असलेल्या जिनसा व मनुष्याच्या नानाविध गरजा यांचा मेळ घालणारा एक दुवा होय.
 मनुष्याच्या गरजा भागविण्याचे सामर्थ्य असलेल्या जिनसा मनुष्याच्या नानाविध गरजा व चलन यांना एकत्रित आणणारें ठिकाण म्हणजे जगांतील बाजारपेठा होत, या बाजारपेठांतून बाजारभाव खालील तीन गोष्टींच्या आधारे निश्चित होत असतात.

(१) समाजांतील खेळत्या चलनाचे परिमाण,

(२) जिनसांच्या उत्पादनाचें परिमाण, व

(३) सदर जिनसांना असलेली मागणी.

 वरीलपैकी कोणत्याही दोन बाबी स्थिर असतां तिसऱ्या बाबीतील कमी अधिकपणानुसार बाजारभावांत चढउतार होतात, हें अधिक स्पष्ट करणें- करितां आपण एक उदाहरण घेऊ.
 उदाहरणार्थ- - एकाद्या शहराची लोकवस्ती एक लक्ष आहे. येथील ज्वारीचा वार्षिक खर्च दोन लक्ष मण आहे व ज्वारीचे एक मणास ८ रुपये या भावानें सोळा लक्ष रुपये, दोन लक्ष मण ज्वारीची किंमत होते, असें आपण धरलें, म्हणजे याचा अर्थः-

(१) चलन सोळा लक्ष रुपयांचे

(२) मालाचा पुरवठा दोन लक्ष मण व

(३) मागणी दोन लक्ष मणाची.

 परंतु व्यापारधंदा भरभराटीत आल्यामुळे लोकांचे जवळ अधिक पैसा खेळता राहिल्यास सहाजिकपणेच ज्वारी विकत घेणेंकरितां येथील लोकांजवळ सोळा लक्ष रुपयाचे ऐवजीं अठरा लक्ष रुपये आहेत असे समजूं ; मात्र ज्वारीचा पुरवठा दोन लक्ष मणाचाच कायम असून मागणीही पूर्वीइतकी व म्हणजे दोन लक्षमणाचीच आहे, तर ज्वारीचा दरमणी भाव साठ रुपयाचे