पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास
प्रकरण पहिले.
विषय प्रवेश.

 हिंदी चलन पद्धतीच्या इतिहासाचें पूर्णत्वाने आकलन होण्याकरितां आपणांस प्रथम चलनाचे सामाजिक जीवनांत स्थान काय आहे, चलन म्हणजे काय, चलनाची आवश्यकता केव्हां व कां प्राप्त झाली, मानव- जातीच्या सुधारणेबरोबर चलनपद्धतींत कशी कशी सुधारणा होत गेली व हल्लीं उत्तम कार्यकारी मानली गेलेली चलनपद्धति कोणती वगैरे बाबींचा विचार केला पाहिजे.
 अर्थातच या लहानशा निबंधांत वरील बाबींचा अगदींच त्रोटेक विचार होणार हे उघड आहे. तरीपण या बाबींचा त्रोटकच कां होईना, पण विचार केल्याविना आपणांस आपल्या मुख्य विषयाकडे वळतां येणार नाहीं; म्हणून तिकडे आतां आपण वळू.

" चलनाचें सामाजिक जीवनांतील स्थान "

 जमीन, पाणी, खाणी, वगैरे सृष्टिनिर्मित वस्तू, मनुष्याचें श्रम आणि भांडवल, यामुळे जगांत संपत्तीचे उत्पादन होते. अर्थ शास्त्रांत संपत्ति याचा अर्थ "मनुष्याच्या नानाविध गरजा भागविण्याचे सामर्थ्य असलेल्या जिनसा "