पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विषमता व द्वेषरूपी कुरूपता कमी करीत मानवी जीवन शिव व सुंदर करीत खस्यो अर्थानि सौंदर्यबादी व्हा म्हणजे व्यापक अर्थाने जीवनवादी व कलावादी पण एकसमयी व्हाल, हे नम्रपणे सांगू द्या! हेच जीवनाचं व कलेचं सत्य आहे, हे ठासून सांगू द्या !


चार
कलावंताची अभिव्यक्ती व
व्यापक सांस्कृतिक स्वातंत्र्य

 मद्रास हायकोर्टानं ट्रोलिंगला कंटाळून लेखक म्हणून स्वत:ला मृत घोषित करणा-या तामिळ लेखक पेरूमल मुरूगन याला जिवंत करीत 'लिहीत रहा' असं अभय देणारं निकालपत्रच दिलं, त्या निकाले पत्राचं हे भरतवाक्यासारखं शेवटचं वाक्य मी आपणास आज लेखक - कलावंताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो संकोच नॉन स्टेट अॅक्टर्स' किंवा 'फ्रीज एलेमेंट्स' करीत आहेत, त्या पार्श्वभूमीवर सांगू इच्छितो. मद्रास हायकोर्टानं केवळ पेरूमल मुरूगनलाच नाही तर तमाम भारतीय खकाना 'लिहिते राहा - व्यक्त होत राहा' असं एकप्रकारे अभय दिलं आहे, त्याचा आपण फायदा करून घेत निर्भयपणे जे खुपतं. व्यक्त करावंसं वाटतं. ते स्पष्टपणे लिहिले पाहिजे - व्यक्त केलं पाहिजे. तथाकथित संस्कृतिरक्षक व अगदी सौम्य का-टिपण्णीनंही दुखावल्या जाणा-या मूठभरांच्या झुंडशाहीपुढे आपण मान न पुकवली पाहिजे. कारण संविधानाचं कवचकुंडलं कलम १९ द्वारे आपल्याला मिळालं आहे. ते आपण केवळ जपलंच नाही तर निर्भीडपणे वापरलंही पाहिजे.

 भारताच्या प्रत्येक नागरिकास भाषण व अभिव्यक्तीची मूलभूत अधिकार सावधानाने दिला आहे. त्यामळेच कलावंताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न निकोप समाजासाठी महत्त्वाचा आहे. कारण कलेद्वारे कलावंत समाजाचे केवळ रंजन करत नाही, तर उद्बोधन पण करतो, त्यामुळे समाज हा उन्नत व प्रगतिशील होत जातो. पण मागील काही वर्षांत कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकोच करणाच्या अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. त्यातलं सर्वांत महत्त्वाचे प्रकरण पेरूमल मुरूगनचं आहे. कारण मद्रास उच्च न्यायालयानं त्याच्यातला मृत लेखक पुन्हा पुनर्जीवीत केला आहे. अर्मत्य सेनवरील लघुपट असो किंवा २०१७ च्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरीनं निवडलेले 'न्यूड' व 'एस. दुर्गा' चित्रपट ९नवळी सरकारकडून वगळणे असो, या घटना सरकारचा केवळ अनुदार दृष्टिकोन व्यक्त करीत नाहीत, तर त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य नियंत्रित करण्याची,

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / २७