पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असंभव मालिकेमुळे आम जनतेचा यावर गाढा विश्वासही बसत चाललेला आहे. आपण म्हणजेच आपले शरीरदेखील निसर्गाच्या कार्बनच्या चक्रात असेच फिरत असते.
 म्हणजेच, एका परीने निसर्गातील सगळ्याच वस्तू ह्या वापरून झालेल्या वस्तू आहेत. तेव्हा निसर्गाने विविध चक्रे निर्माण करून वापरून झालेल्या गोष्टींच्या योग्य व्यवस्थापनाची सोय केलेलीच आहे. आपले काम आहे ह्या निसर्गचक्रांच्या गतीला विरोध न करता जगायला शिकणे. वापरून झालेल्या गोष्टींचे योग्य व्यवस्थापन करून आपण या निसर्गाच्या विविध चक्रांमध्ये अडथळे न बनवता त्यांना आणखीन गतिमान करण्यात यशस्वी होऊ.
 वापरून झालेल्या गोष्टींचे योग्य व्यवस्थापन करायला पाहिजे, असे आत्तापर्यंत मी सतत सांगत होतो. साहजिकच तुमच्या मनात येणार की, म्हणजे नक्की काय करायला पाहिजे ते सांगा. फक्त एकच करा-कोणतीही गोष्ट वापरून झाली की तिला वाऱ्यावर न सोडता क्षणभर तिच्याकडे बघा. तुमच्या मनात हा विचार येऊ दे की, या वस्तूने तुम्हाला मदत केली आहे. आता तिला टाकून कशी द्यायची ?
मग काय करायचे ?
 खरच या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे आज नाहीये. आणि हेच खरे तर सगळ्या कचरा समस्येचे मूळ आहे. आपण या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे.
 आपण साध्या गुटक्याच्या पाउचचेच उदाहरण घेऊ या. चिमूटभर गुटका आपल्यापर्यंत पोहोचवायला खरे तर हा पाउच किती उपयोगी पडला आहे. पाउच उघडला, गुटका खाल्ला. आता या पाउचचे करायचे काय ? नाहीये आपल्यापाशी उत्तर. म्हणून तो रस्त्यावर टाकला जातो.
 शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याचेही असेच आहे. या कचऱ्याचे करायचे काय ? माहीत नाही, म्हणून मग नागरिक घरातला कचरा रस्त्यावर टाकतात. नगरपालिका तो उचलते आणि दूर शहराबाहेर नेऊन टाकते.
 नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकणे आणि नगरपालिकेने तो उचलून शहराबाहेर टाकणे, या दोन्ही क्रिया सारख्याच आहेत. कोणी कोणाला दोष देऊ नये. या प्रश्नाला एक आणि एकमेव उत्तर आहे. प्रत्येकाने ‘टाकणे' ही क्रिया प्रथम बंद केली पाहिजे.
 ‘शून्य कचरा म्हणजेच ‘वाव (वापरलेल्या वस्तू), यांचे व्यवस्थापन या संकल्पनेचा त्रिसूत्री कार्यक्रम आता तुमच्या लक्षात आला असेल.
१. प्रथम तुम्ही दारावर पाटी लावून जाहीर केले आहे की, तुम्ही तुमच्या घरातून कचरा बाहेर देणार नाही.

२. वापरून झालेल्या गोष्टींकडे त्या वापरून झाल्यानंतर, तुम्ही क्षणभर विचारपूर्वक बघणार आहात.


‘वाव' वापरलेल्या वस्तू * १३