पान:व्यायामशास्त्र.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२५] स ३. उपकर्षक ( जवळ ओढणारे ). [अंडक्टॉर मसल्स. क्रिया--मांडी आंत ओढण्याचे काम या स्नायूचे आहे. घोड्यावर बसलो असतां घोडा मांडीत दाबून धरप्यास या स्नायूचा उपयोग होतो. स ४. अपकषक ( दूर ढकलणारे ) [ अंबडक्टॉर मसल्स.] | क्रिया-हे स्नायु मांडी बाजूने वर नेतात. पाय फांकतांना किंवा पाय बाजूने वर उचलतांना या स्नायूचा उपयोग होता. स ५. द्विपद-बायसेप्स मांडीचे मागील भाग हा स्नायु आहे. क्रिया-तंगडी वांकावणे हे या स्नायूचे काम आहे. तंगडीतील स्नायु. ज १. अंतर्जघ. [ टिबिअलिस अँटिकस ] हा स्नायु तंगडीचे पुढील भाग आहे. | क्रिया-पाऊल घोट्याच्या सांध्यावर वरचे बाजूस वळविण्याचे काम हा स्नायु करतो. जा २, पिंडक व सुतल. [ गॅस्ट्रोनिमियस व सोलियस ] । हे स्नायु तंगडीचे मागील भागी आहेत. पोटरीस हात लावला असतां जे स्नायु हातास लागतात ते हेच होत. | क्रिया--(१)टांच वर ओढून पाऊल उभे अथवा ताठ करणे म्हणजे तंगडीशी सरळ रेषेत आणणे. (२) चालतांना पाऊल वर उचलणे. ( ३ ) उभे राहिले असतां पाऊल आडवें ताठ राहण्यास मदत करणे.