पान:व्यायामशास्त्र.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग २ रा. निरानराळ्या व्यायामांत कोणत्या रनायूस व्यायाम होतो या विषयीचे विवेचन.


:*:- - कोणत्या श्रमांत कोणत्या स्नायूंस व्यायाम घडतो, याचे जे विवेचन पुढे केले आहे, ते स्थूलमानाने आहे असे समजावे. ज्याप्रमाणे झाडाची एक फांदी हालली कीं, इतर फांद्या थोड्या बहुत हालतात, त्याप्रमाणे शरिरांतील एका स्नायूंत हालचाल झाली की, शेजारचे स्नायूंमध्ये थोडी हालचाल होतेच. म्हणून अमक्या व्यायामांत अमृक स्नायूंस व्यायाम होतो याचा अर्थ एवढाच समजावा की, त्या व्यायामाने त्या स्नायूंस विशेष व्यायाम । होतो. अर्थात् त्या व्यायामाने शेजारच्या स्नायूंस थोडा बहुत व्यायाम होतोच असे समजावे. | तसेंच, पायास : व्यायाम झाला म्हणजे फुफ्फुसांस व्यायाम । होतोच, असे समजावे. ( कारण पुढे सांगितले आहे. ) म्हणून ज्या व्यायामांत पायांस विशेष व्यायाम होतो, त्या व्यायामापासून फुफ्फुसांसही व्यायाम होतो असे समजावे.

तालीम, उठाबशा- स ३, स ४ खेरीजकरून कमर व पाय यांतील सर्व मोठे स्नायंना व्यायाम होतो. चवड्यावर उभे राहून उठा-वशा काढल्या असतां तंगड्यांचे स्नायूस विशेष चांगला व्यायाम होतो. उठाबशा काढतांना होणा-या व्यायामासंबंधाने सविस्तर माहिती:- - It