पान:व्यायामशास्त्र.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१३] । असंख्य सूक्ष्म पिशव्या मिळून फुफ्फुस हे इंद्रिय झाले आहे. आपण श्वास घेतो तेव्हां पिशव्या हवेने भरतात. फुफ्फुसांत येणाच्या रक्तातील कार्बनिक आसिड नामक विषारी वायु घेऊन रयास हवेतील ऑक्सिजन देऊन शुद्ध करणे हे फुफ्फुसांचे काम आहे. फुफ्फुसांच्या संकोच-विकासानेच श्वासोच्छ्वास चालतो. आपण साधारणपणे एका मिनिटांत १८ वेळां श्वासोच्छास करतो. रसवाहिन्या, शरिरांत जी झीज होते ती भरून काढण्याचे काम रक्ताचे. आहे. झीज झालेल्या ठिकाणी सूक्ष्मवाहिन्यांतून रक्ताचा प्रवाह मेल्यावर त्या रक्तातील पोषक द्रव्य झिजलेल्या . भागांकडून शोषून घेतले जाते. हे द्रव्य कमी झाल्यावर रक्ताचा जो पातळ भाग राहतो त्यास रस असे नांव दिले आहे. या रसाचा फिरून उपयोग । होण्यासारखा असतो व ते जमा करण्यासाठी सूक्ष्मरक्तवाहिन्याजवळ सूक्ष्म नलिका किंवा शिरा असतात. त्यांना तो झिरपून येतो. या शिरा एकमेकांस मिळून मोठ्या होत जात जात शेवटी त्यांच्या दोन मोठ्या शिरा होतात. या शिरांच्या द्वारे हा रस वाहत जाऊन शेवटीं तो दोन मोठ्या अशुद्धरक्तवाहिन्यांत पडतो. या रस वाहून नेणान्या नळ्यांना रसवाहिनी नळ्या असे म्हणतात. अन्न आंतड्यांतून जात असतां, अन्नांतील पोषाक रस आंतड्याच्या ज्या सूक्ष्म नळ्या शोषून घेतात त्याही रसवाहिनीच होत. कारण त्यांच्यांतील रस वर सांगितलेल्या नळ्यांतील रसासारखाच