पान:व्यायामशास्त्र.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। १४ ] असतो. या नळ्या मिळून शेवटीं जी एक मोठी नळी होते, तीच वर सांगितलेल्या दोन शिरांपैकी एक होय. जेथे जेथे म्हणून शुद्धरक्तवाहिन्या आहेत, तेथे तेथे रसवाहिन्याही आहेत. | ज्ञानततु, शुद्धरक्तवाहिन्या, अशुद्धरक्तवाहिन्या, व रसवाहिन्या ह्या शरिराच्या सर्व भागांत एकीजवळ एक आहेत. त्वचा. आंतील नाजूक इंद्रियांना हवेतील अंडी व उष्णता यांपासून व कोणत्याही आघातापासून अपाय होऊ नये म्हणून त्या सर्वांवर त्वचा ( कातडी ) हे एक आच्छादन घातले आहे. मुख्य दोन थर मिळून त्वचा झालेली आहे. पैकी वरील थरास बाह्य त्वचा म्हणतात व आंतील थरास आंतर त्वचा म्हणतात. थोडेसे खरचटले असतां, अशा खरजेचा किंवा भाजल्याचा फोड आला असतां, जी पातळ उचा वर फुगून येते, ती बाह्यत्वचा होय. ही फार पातळ असते. हिचे खालीं जी त्वचा असते ती आंतर त्वचा होय. खरी त्वचा ती हीच. हिची जाडी :- ते इंचार्पयत असते. त्वचेत शुद्धरक्तवाहिन्या, अशुद्धरक्तवाहिन्या, रसवाहिन्या व ज्ञानतंतु हे असून शिवाय स्वेदवाहिन्या ( ज्यांतून घाम वाहतो अशा नव्या ) व तैलवाहिन्या या सूक्ष्म नळ्या आहेत. रक्तांतील घाण घामाच्या रूपाने बाहेर आणून टाकण्याचे काम वेदवाहिन्यांचे आहे.