पान:व्यायामशास्त्र.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९] स्त्रिग्ध अन्नांत यकृतांतील पित्त व स्वादापिंडांतलि स्वादुरस हे मिसळले म्हणजे ते पचनास योग्य होते. अन्न जठरांतून आंतड्यात उतरण्याच्या सुमारास त्यांत यकृत् व स्वादुपिंड यांतील रस येऊन पडतात; म्हणून स्निग्ध 'अन्नाचे पचन आंतड्यांत होते. | अन्न तोंडात पडल्यापासून ते मलाचे रूपाने बाहेर पडे तोपर्यंत ६-१२ तास लागतात. • अन्ननलिकेतून अन्न जात असतां त्याची स्थिति पुढीलप्रमाणे हात.:--- * तोंडांत अन्नाचे चर्वण होऊन त्यांत लाळ मिसळते. पिष्टमय भागांत लाळ मिसळल्याने तो पचनास योग्य होतो. अन्न कोठ्यांत गेयार त्यांत कोट्यांतून स्रवणारा जाठर-रस नांवाचा रस मिसळतो. तो मिसळल्याने मांसोत्पादक भागाचे पचन होते. पुढे अन्न आंतड्यांत उतरताच त्यांत पित्त । व स्वादुपिंडरस हे येउन पडतात. या रसांच्या योगाने स्निग्ध द्रव्यांचे पचन होते. याप्रमाणे क्रिया झाल्यावर, ज्या भागाचे पचन व्हावयाचे राहिलेले असते, तो भाग आंतड्यांतून जात असता, त्यामध्ये आंतड्यांतून स्रवणारा रस + मिसळतो व तेथे त्याचे पचन होते. नंतर पचनास अयोग्य अंसा भाग मलरूपाने पडून जातो. , f मलशुद्धि साफ करविणे हाही पित्ताचा धर्म आहे. ६ स्वादुपिंड-रसामध्ये इतर प्रकारची अन्न पचविण्याचीही शक्ति आहे. । आंतड्यांतून खवणा-या रसांमध्ये तान्ही प्रकारची अन्न पचविण्याची शक्ति आहे.