पान:व्यायामशास्त्र.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्धात. -S०ऽ-- व्यायाम-शास्त्राचे हत्य शारीरिक संपत्ति प्राप्त करून घेण्यास व्यायाम हा सर्वोत्कृष्ट उपाय आहे. ज्याप्रमाणे ( १ ) कर्जबाजारी किंवा नादार असणे, ( २ )कर्ज नसणे व संपत्तिही नसणे, व (३) कर्ज नसून संपात्त मात्र पुष्कळ असणे हे मनुष्याच्या सांपत्तिक स्थितीचे, तीन प्रकार आहेत, त्याप्रमाणे प्रत्येक गुणा संबंधाने व्यक्तीच्या तीन स्थिति आहेत. पहिली स्थिति, त्या गुणाच्या उलट प्रकारचा गुण आंगीं असणे; दुसरी स्थिति, तो गुण अथवा त्याच्या उलट गुण हे दोन्हीही आंगी नसणे; व तिसरी स्थिति, तो गुण अंगी असणे. हीच गोष्ट शारीरिक संपत्तीला लागू आहे. म्हणजे शारीरिक संपचासंबंधाने मनुष्याच्या तीन स्थिति असू शकतात. पहिली स्थिति, शारीरिक संपत्ति आंग नसून उलट शरीर विकारयुक्त असणे ही होय. दुसरी स्थिति, दृश्य विकार आंगीं नसणे व शक्ति, उत्साह इत्यादि शारीरिक संपत्तीचे अनुषंगी गुणही आंगीं विशेष नसणे ही आहे. तिसरी स्थिति, शरीर विकारयुक्त नसून उलट सतेज, उत्साही, बलवान व विकारास ( अथवा इतर आरोग्यशत्रुस ) न जुमानणारे असे असणे ही आहे.. आतां नेहमी कर्जबाजारी असणा-या लोकांना कर्ज नसणे, हीच ज्याप्रमाणे उत्तम सांपत्तिक स्थिति वाटते, त्याप्रमाणे आपली स्थिति झाली आहे. म्हणजे, बहुतेक