पान:व्यायामशास्त्र.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २ ] माणसे कमी जास्त मानाने रोगग्रस्त असतात असे पाहून निरोगपणा, म्हणजे रोगमुक्तता अथवा निरामयता म्हणजे दृश्य रोगापासून मुक्त असणे) हीच उत्तम शारीरिक स्थिति अशी आपली समजूत झाली आहे. वास्तविकपणे पाहतां, रोगमुक्तता ही मध्यम स्थिति आहे; व ज्याप्रमाणे कर्जातून मुक्त होणे यापलीकडे संपत्तिमान होणे ही अवस्था आहे, त्याप्रमाणे रोगमुक्ततेच्या पलीकडे शारीरिक संपत्ति ( अपूर्व उत्साह, अचाट शक्ति व रोगांशी झगडण्याचे सामथ्र्य इ.) आंगीं असणे ही स्थिति आहे. परंतु पूवीं सांगितल्याप्रमाणे ही मनुष्याची स्वाभाविक श्रेष्ठ स्थिति लोक विसरले गेल्यामुळे रोगापासून मुक्त असणे एवढाच शारिरिक सुस्थिति' या शब्दांचा अर्थ आहे, असे लोक समजू लागले आहेत. याच कारणामुळे शरिराच्य। उत्तम स्थितीस अरोग्य, निरोगीपणा, निरामयता अशी केवळ अभावद्योतक नांवे देण्यात आली आहेत, व ही अभावात्मक स्थिति प्राप्त करून देणारी साधने जी औषधे व त्यांचे शास्त्र यांस अद्वितीय महत्व आले आहे. परंतु, रोगनिर्मुक्ततेच्या पलीकडे एक स्थिति आहे, व ती प्राप्त करून घेणे आपले स्वाधीन आहे, एवढेच नव्हे, तर ते आपलें पवित्र कर्तव्य आहे हे लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे. ही गोष्ट लोक विसरले आहेत व या गोष्टीचे त्यांना महत्व विशेष वाटत नाही, या गोष्टीचे प्रमाण हेच आहे की, वैद्यशास्त्राप्रमाणे परीरिक संपत्ति कमविण्याचे शास्त्राचा लोक अभ्यास करीत नाहीत 'कमविण्याचा प्रयत्नही विशेष करीत नाहीत. दवाखाने स्थापन

  • लोक जितके पैसे खर्च करतात, तितके ते आरोग्यशाला