पान:व्यायामशास्त्र.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ ५ वर्षांतून निदानीं एकदा तरी कुस्त्या व खेळ यांचे सामने करून शारीरिक सामर्थ्य अथवा कौशल्य दाखविणा-यांस बक्षिसे द्यावी. . व्यायामशास्त्रासारख्या विषयावर लिहिण्याचा अधिकार प्रस्तुत ग्रंथकर्त्यांचा नाही, हे तो जाणून आहे. परंतु ज्यांचा तसा अधिकार आहे, त्यांनी अशा प्रकारचा ग्रंथ न लिहिल्यामुळे, ही उणीव तशीच राह देण्यापेक्षा, आपणांस लिहितां येईल तसा ग्रंथ लिहावा, म्हणजे कदाचित् तज्ज्ञांचे लक्ष प्रस्तुत विषयाकडे जाऊन त्यांचे हातून यापेक्षा जास्त चांगला ग्रंथ निर्माण होईल, असा विचार करून प्रस्तुत पुस्तक लोकांपुढे ठेविले आहे. तरी यामध्ये जी कांहीं व्यंगे असतील, त्यांचेकडे कानाडोळा करावा अशी विद्वानांना विनंति आहे. प्रस्तुत पुस्तकाची हस्तलिखित प्रत विद्वद्वर्य डा० देशमुख व डा० छत्रे यांना दाखविली होती; व पुस्तक छापून निघत असतां । त्यांतील कांहीं भाग असिस्टंट सर्जन डॉ० शिखरे, डॉ० छत्रे, डॉ. भागवत, डॉः सहस्रबुद्धे, वे बाळशास्त्री लागवणकर, रा० गणपतराव वझे या सद्गृहस्थांना दाखविला होता. त्यांनी आपला वेळ खचून पुष्कळ उपयुक्त सूचना केल्या. त्यांबद्दल मी या गृहस्थांचा फार फार आभारी आहे. ह्या रीतीने प्रस्तुत पुस्तकांत दोष राहू नयेत म्हणून मी आपल्याकडून पुष्कळ प्रयत्न केले आहेत, तरीही पुस्तकाचा सर्व भाग वरील सर्व गृहस्थांचे अवलोकनांत न आल्यामुळे किंवा कांहीं अन्य कारणाने पुस्तकामध्ये कांहीं दोष राहण्याचा संभव आहे. ह्यास्तव हे कळविणे अवश्य आहे कीं, ह्या दोषांबद्दलची जबाबदारी सर्वस्वीं मजवर आहे. प्रस्तुत ग्रंथ लोकोपयोगी व्हावा म्हणून लिहिला आहे. ह्यास्तव त्यामध्ये जे दोष दिसतील, ते वाचकांनी जरूर कळवावे. ह्या ग्रंथाची