पान:व्यायामशास्त्र.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुसरी आवृत्ति काढण्याचा सुप्रसंग आल्यास, दोषांची दुरुस्ती अवश्य केली जाईल. । प्रस्तुत पुस्तक लिहिण्याचे काम मुख्यतः पुढील ग्रंथांचा । उपयोग झाला आहे, ह्यास्तव त्या ग्रंथांच्या कत्याचे आम्ही फार आभारी आहों. Cassell's Complete Physical Educator, by E. Miles. Breathing. by E. Miles. Exereise for Health, by Hulbert and Phelin. My System, by Muller. Milo's strength for all. Strength & how to obtain it, by E. Sandow. Body Building by E. Sandow. The Science & Art of Physical Development by Pope. Ideal Physical Culture by Apollo. The Theory and art of Physical Exercise, by Chesterton. तसेच, या पुस्तकांत स्नायूंचा निर्देश करण्याकरितां ने संस्कृत शब्द योजिले आहेत, ते डा० गर्दे यांच्या परिश्रमांमुळे मिळाले | 1 वरील पुस्तकांची यादी पाहून ती वाचण्याविषयीची उत्सुकता कांहीं वाचकांना होईल व ते ती पुस्तके विकत घेतील; म्हणून पुढील माहिती देणे इष्ट वाटते. वरील पुस्तकांपैकी शास्त्रीय माहितीचे दृष्टीने विशेष उपयुक्त अशी पुस्तकें वरील यादीतील पहिली ३-४ होत. बाकीच्या पुस्तकांत शास्त्रीय माहिती फार थोडी आहे. ह्या पुस्तकांचा बराच भाग ग्रंथकर्त्याने स्वतांसंर्वधाने दिलेल्या माहितीने भरलेला आहे. म्हणून शास्त्रीय माहिती ज्यांना पाहिजे असेल, त्यांनी पहिल्या तीन चार पुस्तकांवांचून इतर पुस्तके घेण्याचे भानगडीत पडू नये.