पान:व्यायामशास्त्र.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यांनी पुढील गोष्टी अवश्य कराव्या. त्या त्यांनी केल्या नाहीत, तर त्यांनी हे पुस्तक व्यर्थ वाचलें, असें ग्रंथकर्त्यास वाटेल. १ स्वतां रोज, किंवा निदानीं आठवड्यांतून एकदां, रविवारी) कसल्या तरी प्रकारचा व्यायाम घ्यावा. ज्यांना कृत्रिम व्यायामाची कंटाळा वाटत असेल, त्यांनी गांवाशेजारील एखाद्या टेकडीवर फिरावयास जावें. ज्यांना फिरण्याचा कंटाळा असेल, त्यांनी आपल्या परसांत कुदळीने जमीन खणण्याचा परिपाठ चालू ठेवावा. वांकून जमीन खणणे ह्या व्यायामांत हा एक विशेष गुण आहे की, त्याच्या योगाने पोटाचे स्नायूस चांगल्या प्रकारचा व्यायाम मिळतो. हैं। खणण्याचे काम एकाद्या शेतांत केले, तर व्यायामचा व्यायाम होऊन, शिवाय पिकासही चांगला फायदा होईल. । | २ प्राणायामाचे महत्त्व जाणून त्याचा अभ्यास सार्वत्रिक करावा. युरोपियन सैन्यांतील शिपायासही प्राणायाम हा व्यायाम जर आवश्यक केला आहे, तर इकडील शाळांतील ज्या मुलांकडून कवाईत करविली जाते, त्यांचेकडून तो कां करवू नये ? प्राणायामाचा व्यायाम सुरू केल्यानंतर छातीच्या घरामध्ये चांगला फरक पडतो. ही गोष्ट अनुभवाने सिद्ध झालेली आहे. यास्तव, प्राणायामाचा व्यायाम शाळांतून अवश्य चालू करावा, अशी सर्व शाळांच्या चालकांस विनंति आहे. ३ ज्या खेळांपासून शारीरिक श्रम होतात, असे खेळ खेळण्यास लहान मुलांना शक्य तेवढे उत्तेजन द्यावे. ४ गांवांतील तालमींचे पुनरुज्जीवन करून त्यांमध्ये जाण्यास योग्य वयाच्या मुलांना उत्तेजन द्यावे.