पान:व्यायामशास्त्र.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखास व उत्कर्षास, शारीरिक संपत्तीची आवश्यकता आहे; म्हणजे २०० रुपये पगार मिळवून ४० व्या वर्षी मरण्यापेक्षा १०० रुपये महिना मिळवून ६० वर्षेपर्यंत जगणे जास्त फायद्याचे आहे. ही गोष्ट, कोणाही विचारी मनुष्यास समजण्यासारखी आहे. अशी स्थिति असतांना, विद्यकरितां जो पैसा व काल लोक खर्च करतात त्याचा चवथा राहूद्या, पण आठवा हिस्साही शारीरिक संपत्तीचे प्राप्तीसाठी खर्च करीत नाहीत. फार काय; पण शर्ट, जाकिटें, नाटके, चहा, विड्या यांकारितां जितका पैसा लोक खुषीनें खर्च करतात, तितकाही त्यांच्या हातून शारीरिक संपत्ति सुधारण्याच्या कामी खर्च होत नाही. अशा प्रकारचे जे अज्ञान व जी मोहनिद्रा लोकांमध्ये दृष्टीस पडते, ती घालविण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे, हे उघड आहे. अशा प्रकारच्या प्रयत्नास मदत करावी, अशा हेतूने प्रस्तुत पुस्तक लिहिले आहे. ह्या पुस्तकांत सांगितलेले व्यायामाचे महत्त्व व तो घेण्याची योग्य तन्हा, तसेच ब्रह्मचर्य आणि योग्य आहार यांची आवश्यकता, या गोष्टींकडे लोकांचे लक्ष जाऊन व्यायामाचा प्रसार लोकांत जास्त झाल्यास, हे पुस्तक लिहिण्याच्या श्रमाची सार्थकता झाल्याबद्दल ग्रंथकर्यास परमानंद वाटेल. कृतीवांचून नुसते ज्ञान व्यर्थ आहे. दुष्काळपीडित लोकांकरितां जगांतील सर्व लोक हळहळले, परंतु त्यांपैकी एकानेही दुष्काळग्रस्तांस मदत केली नाही, तर त्यांची हळहळ व्यर्थ आहे, हे आपण तेव्हांच कबूल करतो. असेच या विषयासंबंधानेही आहे. शारीरिक संपत्तीचे महत्त्व आपण कबूल केले व ती संपादन करण्याचे उपायाचीही माहिती करून घेतली; पण ती संपादण्याचा प्रयत्न केला नाहीं तर हा सर्व खटाटोप व्यर्थ आहे. म्हणून प्रस्तुत पुस्तक वाचणा.