पान:व्यायामशास्त्र.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ८९ ] वरील व्यायामाचा एक अवघड प्रकारः | पलंगाच्या उंचीचं स्टूल पलंगापासृन थोड्या अंतरावर ठेऊन व त्यावर बसून पलंगाचेखालीं पाय अडकवावे,आणि पावलानें पलंगाचे लांकडास खालून नेट देऊन धड व डोकें हीं मागें वांकवावी. डोकें मागे नेतां येईल तितके नेल्यावर फिरून डोके वर उचलून उठावें. याप्रमाणे करवेल तितक्या वेळां करावें. अर्थात् हा व्यायाम अशक्तांनी करू नये. पूर्व तयारी-पाय पसरून बसावे. हात पुढे ताठ पसरावे. हात पायास टकेतोंपर्यंत * धड पुढे वाकवावे व नंतर मागे सावकाश परत जाऊन जमिनीवर ताठ निजावे. फिरून उठावे व पूर्वीप्रमाणे चलन करावें. । जमिनीवर ताठ निजावे व दोन्ही पाय-अथवा एकेक पाय अनुक्रमाने-सावकाश वर आणावा व फिरून खालीं न्यावा. अ. वरील व्यायामांत, पाय वर करतांना, गुडघ्यांत वांकवावा व मांड्या पोटाचे जवळ जितक्या आणतां येतील तितक्या आणाव्या. असे आळीपाळीनं करावें. पूर्व तयारी-कमरेवर हात ठेऊन उभे रहावें. बेंबी हा मध्य कल्पून सर्व धड, मुली पिंगा घालतात त्या रीतीनें, डाव्या बाजूने वाटोळे फिरवावे. नंतर तसेच उजव्या बाजूने फिरवावें.

  • अशा प्रकारच्या सर्व व्यायामांत हात पायाचे पुढे जातील तर आधक चांगले.