पान:व्यायामशास्त्र.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[९० ] मलावष्टंभ, यकृाद्वकार वगैरे विकारांसाठी व्यायाम. ज्या व्यायामांचे योगाने पोटाचे स्नायु बळकट होतात त्यांचे योगाने वरील विकारही कमी होतात. यकृत् व आंतडी हीं इंद्रिये स्नायुरूपी तंतूंची बनलेली आहेत. यकृत् या इंद्रियाचे मुख्य काम पित्त तयार करण्याचे आहे व आंतड्यांचे काम अन्न कुसकरून त्यांत एक प्रकारचा रस सोडण्याचे व पचन झालेल्या अन्नास व मलास ( स्वतां संकोच पावून ) पुढे ढकलण्याचे आहे. ही कामें योग्य प्रकारे होणे हे यकृताचा व आंतड्यांचा जोरदार संकोच-विकास होण्यावर अवलंबून आहे. यांचा जोरदार संकोच-विकास होण्यास यांचे व पोटांचे इतर स्नायु मजबूत झाले पाहिजेत. म्हणून पोटाचे स्नायु मजबूत करणारे सर्व व्यायाम या विकारांतही उपयोगी आहेत. या व्यायामांचे विशेष प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. पूर्व तयारी-हात वर ताठ पसरून ताठ उभे राहावें कमरेजवळ वांकून-ओणवे होऊन-व हात खाली आणून पायाचे पुढे पाऊण हात अंतरावरील जमिनीस हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. असे करतांना पाय जमिनीवर साफ टेकवून नितंबभाग मागे ढकलावा व सर्व अंगाचा भार टांचावर पडू द्यावा. पूर्व तयारी-डोक्याचे मागे हात ताठ पसरून जमिनीवर ताठ निजावें.