पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आणि मग एक दिवस - नसिरुद्दीन शहा. भाषांतर - सई परांजपे पॉप्युलर प्रकाशन, मुंबई प्रकाशन - २०१६ पृ. २९० किंमत - रु. ६५०/-



आणि मग एक दिवस

 भारतीय स्वातंत्र्यानंतर लगेच जन्मलेली पिढी सन १९७० नंतर वयात आली होती, तेव्हा भारतीय सिनेमा देमार, मनोरंजनापलीकडे जाऊन काही गंभीर प्रयोग करू लागला होता. सत्यजित रे, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सत्यदेव दुबे, विजय तेंडुलकर प्रभृती मान्यवर नाटक, सिनेमा, साहित्य क्षेत्रात नवनवे प्रयोग करत होती. 'समांतर सिनेमा' नावाने ओळखल्या जाणाऱ्या नव्या प्रवाहाने 'अंकुर', 'निशांत', 'आक्रोश', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?', 'मिर्च मसाला', 'मंडी', 'जुनून', 'अर्धसत्य','कथा', 'गोलमाल' असे हटके सिनेमा बनवून प्रेक्षक अभिरुची संपन्न केली होती. मी पिढीचा समांतर साक्षीदार असल्याने माझ्या मुलांना मी 'निशांत','अंकुर' अशी नावं दिली होती. 'हम दो, हमारे दो' चा प्रभाव नसता तर मी भूमिकेलाही जन्म दिला असता. या काळात गिरीश कर्नाड, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आझमी, स्मिता पाटील, फारुख शेख, सईद मिर्झा, अमोल पालेकर आमची दैवतं होती. यात चरित्र अभिनेता म्हणून नसीरुद्दीन शाहचा अभिनय मनावर कायमचे शिलालेख खोदायचा. अलीकडेत्याची इंग्रजी आत्मकथा प्रसिद्ध झाली आहे. 'अँड देन वन डे' तिचं नाव.ती मराठीतही नुकतीच प्रकाशित झाली आहे. 'आणि मग एक दिवस'या

वाचावे असे काही/७९