पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शीर्षकाने, भाषांतर केले आहे प्रख्यात नाटककार सई परांजपे यांनी. हल्ली मराठी प्रकाशने अनुवादगृहे झालीत. त्याबरोबर मराठीत लेखकांपेक्षा अनुवादक अधिक होऊ लागलेत. ते सर्व व्यावसायिक भाषांतरे करीत असताना साहित्यिक कृतीचे भाषांतर किती समरसून करायचे असते याचा वस्तुपाठ सई परांजपे यांनी. या अनुवादाद्वारे पेश केला आहे.

 आत्मकथा उघडं सत्य असायला हवी. ती आत्मस्तुती मुक्त हवी. तिचा नायक लेखक स्वतः असला, तरी आसपासची पात्रं तितकीच महत्त्वाची. ती उत्कृष्ट आत्मटीका असेल तर उत्तम. गुणांबरोबर दोष चर्चा अनिवार्य. माणसाचं आयुष्य जखमांनी भरलेलं असतं तसं त्यात वसंत वर्षावही असतो. माणसाचं जगणं म्हणजे एक संघर्ष गाथाच असते. प्रत्येकाचं जगणं एक आत्मकथाच. पण ती तुम्ही अभिनय, गायन, चित्रकलेच्या तन्मयतेने लिहाल तर तीपण एक कलात्मक कृती होऊ शकते. याचं सुंदर उदाहरण म्हणून 'आणि मग एक दिवस' या आत्मकथेकडे पहावं लागेल. 'सांगत्ये ऐका' नंतरचं हे चंदेरी दुनियेतलं वाचनीय आत्मकथन. त्याला अनुकरणीय मात्र नाही म्हणता येणार.

 नसिरुद्दीन शाह यांचा जन्म सन १९४९-५० चा. ते उत्तर प्रदेशातल्या बाराबंकीमध्ये जन्मले. वडील ब्रिटिश सेवेत होते. नंतर भारतीय प्रशासनात. बदल्या ठरलेल्या. पूर्वज १८५७ च्या लढ्यात ब्रिटिशांच्या बाजूचे होते. स्वातंत्र्यानंतरच्या फाळणीनंतर वडिलांचं कुटुंब दुभंगलं. दोन भाऊ पाकिस्तानात गेले. नसिरुद्दीन शाहांच्या आई-वडिलांनी आले महम्मदशाह व फारूख सुलतान यांनी आपल्या तीन मुलांसह काही जमीन, जायदाद नसताना भारतात राहायचं ठरवलं. ते मुलांना वाढवून मोठे करायचे म्हणून. नसिरुद्दीन प्रख्यात अभिनेते झाले तर मोठा भाऊ झमीर भारतीय सेनेचा उपप्रमुख तर दुसरा झहीर आयआयटी. झमीर शाह पुढे अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरूही झाले. नसिरुद्दीन शाह पदभूषण, फिल्मफेअर, संगीत नाटक अकादमी, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाले.

 ज्या आई-वडिलांची मुलं परीक्षेत नापास होतात, त्यांच्यासाठी नसिरुद्दीन शाहचं जीवन आशा किरण ठरावं. त्यांच्या भाषेत सांगायचं तर 'पन्नास मुलांच्या वर्गात सतत पन्नासावा नंबर असायचा'. औपचारिक शिक्षणात रस नसलेल्या नसिरुद्दीनला जीवनात मात्र गोडी होती. नाटक वाचणे, सिनेमा पाहणे, माणसं निरखणे, नकला करणे त्याचे छंद. पण त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून दिग्दर्शन, अभिनयाचे धडे व पदवी घेतली. पुढे नॅशनल फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून त्यांनी सिनेमा अभिनयात पदवी

वाचावे असे काही/८०