पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्थानच्या स्नुषा झाल्या. जून १९१७ मध्ये मी बरोबर शंभर वर्षांनी स्मरण म्हणून या ओळी लिहीत आहे. माझ्या लक्षात येते की महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, छत्रपती शाहू महाराज या सर्वांनी स्त्री शिक्षण व विकासाचे कार्य केले त्याच्या कितीतरी आधी ब्रिटिश समाज सुधारक स्त्री-पुरुष अधिकारी व समाजसुधारकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत येथील समाजमन पुरोगामी, सुधारणावादी व्हावे म्हणून केलेली मशागत, कायदे, संस्था, प्रयत्न आपण उदाहरणे समजून घ्यायला हवे याची जाण हे पुस्तक निर्माण करते. शिवाय हे पुस्तक माहीत नसलेल्या कितीतरी हृदयस्पर्शी प्रसंगांचे साधार संदर्भ पुरविते म्हणूनही महत्त्वाचे. डॉ. कृष्णाबाई केळवकर आपल्या जीवनसाथी व्हाव्यात म्हणून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची तगमग, आपल्या सुनेला शिकवितात म्हणून स्वगृही राजर्षी शाहू महाराजांची उपेक्षा, स्त्री शिकते म्हणून पुरुषांचे दुखावलेले अहंकार वाचले की लक्षात येतं आजपण पुरुषांनी समाज जीवनात अतिरिक्त स्त्री दाक्षिण्य दाखवायलाच हवे, तरच स्त्री-पुरुष समानता शक्य.

◼◼

वाचावे असे काही/७८