पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साऊथ ब्लॉक दिल्ली - विजय नाईक रोहन प्रकाशन, पुणे पृ. २५९ किंमत - रु. ३००/- प्रकाशन - २०१४



साउथ ब्लॉक दिल्ली

 एखादं चांगलं पुस्तक हाती लागणं म्हणजे वाचकास मिळालेली पर्वणीच! काहींना लॉटरी लागल्याचा आनंद व्हावा. 'साउथ ब्लॉक दिल्ली' हे पुस्तक भारताच्या परराष्ट्र व्यवहाराची बित्तंबातमी देणारं पुस्तक म्हणून मोठंच कुतूहलवर्धक. ते भारतीय राजकीय कूटनीतीचा विश्ववेध घेतं. नवी दिल्लीत 'वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून गेलेले नि तिथेच स्थिरावलेले विजय नाईक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ते उतरलंय. सन १९६७ ते २०१२ म्हणजे सुमारे पाच दशकांच्या परराष्ट्र खात्याचा हा लेखाजोखा. परराष्ट्र खात्याची रचना, इतिहास हे पुस्तक समजावतंच. पण त्यापेक्षा हे पुस्तक एक नवे भान देतं, ते म्हणजे देशांच्या सीमा केवळ शस्त्रांनी सैनिक सुरक्षित ठेवत नाहीत तर देशांचे राजदूत, परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी, शिष्टमंडळे व दोन देशांत होणारी बोलणी, करार, आदानप्रदानातूनही तितक्याच गांभीर्याने देशाचे रक्षणच नाही तर विकास घडवून आणण्यास मोठे साहाय्य होत असते.

 लेखक विजय नाईक हे भारतीय राजकारण, परराष्ट्र धोरण, शिष्टाई, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे चांगले जाणकार आहेत. सन १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी 'युद्ध वार्ताहर' म्हणून कार्य केले आहे. त्यांनी

वाचावे असे काही/६०