पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 चाहत से ज्यादा मजबूत होती है।" हे समजून घ्यायचं तर या संग्रहातील 'ट्रटेगी दासता की बेड़ियाँ' विभागातील ५-६ लेख मुळातूनच वाचायला हवेत. कैलाश सत्यार्थी शिक्षणास स्वातंत्र्याचे साधन मानतात. ते स्पष्ट करणारे या संग्रहातील तीन-चार लेख वाचकास अस्वस्थ करतात. कैलाश सत्यार्थीचा मूळ धर्म गांधीवादी राहिला आहे. मार्क्स आणि गांधींच्या मुशीत तयार झालेले ते कार्यकर्ते होत.

 एके काळी वृत्तपत्र लिखाणातून मिळणाऱ्या मानधनातून त्यांचं घर चालायचं. मी आणि ते एकाच वेळी बालकल्याण, बालविकासाचे कार्य करू लागलो होतो. त्या वेळी ते 'बचपन बचाओ' आंदोलन चालवत. श्रीनिवास कुलकर्णी, सूर्यकांत कुलकर्णी विदर्भ मराठवाड्यात सक्रिय होते. मी पश्चिम महाराष्ट्रात. कैलाश सत्यार्थीच्या नेतृत्वाखाली आम्ही 'ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर्स' काढला होता. बेंगलोरहून महाराष्ट्रात मोर्चाने कोल्हापुरात प्रवेश केला. दोन बसेस भरून जगभरचे मुक्त केलेली बालमजूर मुले, मुली, कार्यकर्ते कोल्हापुरात आले होते. यजमान संस्था होती बालकल्याण संकुल. कैलाश सत्यार्थी दिवसभर व रात्रीही आमच्या मुलात राहिले, जेवले, झोपले इतका साधा माणूस.

 त्या काळी शासन काखा वर करायचे. देशात बालमजूरच नाहीत म्हणायचे. कैलाश सत्यार्थीनी कितीतरी देशात जागतिक निरीक्षक नेऊन फटाके, गालिचे, काच सामानाचे कारखाने दाखवले. 'हा सूर्य, हा जयद्रथ' ही त्यांच्या कामाची पद्धत या सर्व पुस्तकात उतरली आहे. शिक्षण ही काही धर्मादाय कृती नव्हे, उपकार नव्हे, तो मुलांचा हक्क आहे ठणकावून त्यांनी सांगितल्यानंतर आपल्याकडे 'सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा' (२००९) राष्ट्रीय स्तरावर पास झाला. 'बालमजुरी प्रतिबंधक अधिनियम - १९८६' आला तो सत्यार्थीमुळे. ही सारी लढाई, संघर्ष वैचारिक अंगानी समजून घ्यायची, तर 'आजाद बचपन की ओर' वाचनास पर्याय नाही. कैलाश सत्यार्थी बालविकास, बालकल्याण कार्य, दया, धर्म, पुण्य म्हणून करण्याच्या विरोधी आहेत. तो बालकांचा हक्क असून तो बजावणे देशाचे, जगाचे ते कर्तव्य मानतात. मुलांशी त्यांचं असलेलं नातं संवेदना, समानता, सन्मान व सहाध्यायाचे राहिले आहे. समस्येचा बाऊ करण्यापेक्षा ती सोडवण्याची बांधिलकी ते महत्त्वाची मानतात. ते आशावादी आहेत. 'जो लोग अपने आत्मविश्वास और रचनात्मकता की चिनगारियों से एक छोटा-

सा दिया जलाने का उपाय खोज निकालते है, उन्हें अँधेरा कभी हताश नहीं

वाचावे असे काही/१८