पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असा प्रश्न पडला नाही." पुढे तो म्हणाला, "माझे आजोबा, वडील जे करत आले तेच मी करत राहिलो. माझा मुलगा तेच करणार. बाळ, तुला सांगू का? अरे, आमचा जन्मच मुळी मोलमजुरी करून जगण्यासाठी झालाय ना?" बाबांच्या त्या पराधीनतेने कैलास सत्यर्थीना बेचैन केलं. ती बेचैनी घेऊन कळायला लागल्यापासून गेली ३५ वर्षे अव्याहत ते मुलांना बालपण बहाल करून देण्यासाठी झटत आहेत.

 'आजाद बचपन की ओर' हा त्यांनी गेल्या ३५ वर्षांत वेळोवेळी लिहिलेल्या अशा लेखांचा ऐतिहासिक संग्रह आहे की ज्यामुळे जगात बालकांचे हक्क, बालमजुरी निर्मूलन, बालशिक्षण, बाल यौन शोषण, बालक अत्याचार, बालपण रक्षण इत्यादी प्रश्न जागतिक प्रश्न बनून पुढे आले. आज जगात १७ कोटी मुले-मुली बालमजूर म्हणून कार्यरत आहेत. जगातील ६ कोटी मुलांनी तरी अजून शाळेचे तोंडच पाहिलेले नाही. ८५ लक्ष मुले, मुली अल्पवयीन वेश्या, भिकारी म्हणून जीवन कंठतात. कितीतरी देशातील मुलांच्या हातात पाटी-पेन्सिल येण्याऐवजी बंदूक आणि गोळ्या येतात. अंमली पदार्थ वाहतुकीत मुला-मुलींचा सर्रास वापर केला जातो. भारतातलं बालपण किती गुलामगिरीचं जिणं जगतात, हे त्यांना समजून घ्यायचे आहे. त्यांच्यासाठी हे पुस्तक बालभ्रमाच्या निद्रेतून खडबडून जागे करणारा वैचारिक सूतळी बाँबच.

 कैलाश सत्यार्थीच्या या लेखसंग्रहात विषयनिहाय वर्गवारी केल्याने आपणास त्या विषयाचे विविध पक्ष ते लेख समजावतात. 'मुक्तीचे स्वप्न' या भागात बालपण विशद करण्यात आले आहे. 'बालपणाचे स्वातंत्र्य'मध्ये बालमजुरी मुक्तीशिवाय अशक्य असल्याचे समाजभान देतात व या विषयाची जाणीव, जागृतीपण. 'बालविक्री' विभाग गाव बाजारात शेळ्या, कोंबड्या विकतात तशा मुलीपण विकल्या जातात, ते वाचताना आपल्या माणूसपणाची शरम वाटू लागते. मला आठवतं की मागे विजय तेंडुलकरांनी 'कमला' नावाचे नाटक लिहिले होते. त्यात बालिकांची खरेदी विक्री चित्रित केली होती. पत्रकार, समीक्षकांनी त्या नाटकास 'कल्पनेचे तारे' म्हटल्यावर उसळून कैलाश सत्यार्थीची साक्ष दिली होती. विजय तेंडुलकर तर एकदा म्हणाले होते की, 'भरल्या घरात मुलं अनाथ असतात.' त्या वेळी त्यांनी बाल सुरक्षेचा जो प्रश्न उपस्थित केला होता, तो या लेखसंग्रहात कैलाश सत्यार्थीनी 'बचपन की सुरक्षा' भागात मांडला आहे. या लेखसंग्रहाचं सूत्रवाक्य आहे, “मैं नहीं मानता की गुलामी की बेडियाँ आजादी की

वाचावे असे काही/१७