या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कार्लाइल -
- आतापर्यंत मनुष्यजातीने जे काही केले आहे, ते सर्व पुस्तकांमुळे आहे।
आणि ते पुस्तकातही आहे.
जॉर्ज बिल -
- पुस्तके विचारप्रसारचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे.
हॅरी टूमन -
- प्रत्येक वाचक हा नेता नसतो; पण प्रत्येक नेता वाचक असला पाहिजे.
पीटर ड्रकर -
- आपल्या नव्या ज्ञानअर्थव्यवस्थेत तुम्ही कसं शिकायचं' हे शिकला
नाही, तर तुम्हाला अवघड परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.
होरेस मान -
- दररोज थोडं तरी, अगदी एक वाक्य का होईना वाचा. दिवसाकाठी अशी
पंधरा मिनिटं जरी मिळाली तरी आयुष्याच्या उत्तरार्धात ती तुम्हाला समृद्ध करून टाकतील.
व्हॅना व्हाईट -
- वाचन हे काही जगातले सर्वाधिक बुद्धिमान काम नाही; पण मला अक्षरे
माहीत असायला हवीत.
जी.के. चेस्टरटन -
- एखाद्या उत्साही माणसाला वाचायला पुस्तक हवे असणे नि ते तसे एका
दमलेल्या माणसाला हवे असणे, यात फरक आहे.
जॉन लॉक -
- वाचनाने मनाला फक्त ज्ञानसाधनांची प्राप्ती होते; पण विचारांमुळे जे
वाचलं जातं ते आपलं होतं.
नॉर्मन कझिन्स -
- ज्याला वाचायला येतं अशी व्यक्ती खोलवर वाचायला शिकते आणि मग
जीवन आतून-बाहेरून बदलून जातं.
वाचन १३३