पान:वाचन (Vachan).pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मार्टायनर अॅडलेर आणि चार्ल्स व्हेन डोरेन -

  • वाचनाची कला म्हणजे प्रत्येक प्रकारचं संज्ञापन शक्य तितक्या चांगल्या

त-हेने ग्रहण करण्याचं कौशल्य होय.

अर्नेस्ट हेमिंग्वे -

  • चांगलं लिखाण हे वास्तुशास्त्राप्रमाणे असतं, अंतर्गत सजावटीप्रमाणे नसतं.

फ्रान्सिस बेकन -

  • काही पुस्तके चाखायची असतात. काही गिळायची असतात. काहीं मात्र

पचवायची असतात. अल्बर्ट मॅग्युएल -

  • वाचन जसं वाढेल तसं भूमितीच्या पटीनं ते वाढत जातं.

मार्क ट्वेन -

  • जो माणूस चांगली पुस्तके वाचत नाही त्याच्यात नि वाचता न येणा-या

माणसात काहीच फरक असत नाही.

मिअँडर -

  • जे वाचतात त्यांना इतरांपेक्षा दुप्पट दिसतं.

अॅल्डस हक्सले -

  • वाचणारा माणूस जीवनाचा पुरेपूर आस्वाद घेतो.

इ.सी. मेकेंझी -

  • काही विद्यार्थी ज्ञानाच्या कारंज्यातले पाणी पितात, तर काही फक्त चुळा भरतात.

बेन फ्रैंकलिन -

  • ज्ञानात केलेली गुंतवणूक उत्तम व्याज देते.

अर्ल नाइंटिंगेल -

  • पृथ्वीसाठी सूर्याचं जे स्थान आहे, ते माझ्यासाठी पुस्तकांचं.

चार्ल्स ई.टी. जोन्स -

  • तुम्हाला दोनच गोष्टी बदलतात. एक भेटणारी माणसे नि दुसरी म्हणजे
    वाचन/१३४