या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
- सामर्थ्यवान ग्रंथ तापलेल्या लोखंडाप्रमाणे असतात. एखाद्या समाजमनावर
त्याचा छाप उमटतो. असे ग्रंथ थोड्या लोकांनी वाचले तरी परिणाम साधतो. जग बदलून जाते.
रॉय एल. स्मिथ -
- सर्वसाधारणपणे एक चांगलं पुस्तक प्रत्येक खरयाखु-या महान व्यक्तीच्या
यशाचा पाया असतो.
- चांगल्या बँकेपेक्षा चांगल्या पुस्तकांमध्ये खरी संपत्ती असते.
डॅनियल जे बुरस्टिन -
- वाचनामुळे आपणास स्वत:ची, जग नि इतिहासाची ओळख होते.
राल्फ वाल्डो इमर्सन -
- अनेकदा वाचनाने माणसाचा भविष्यकाळ घडविला आहे.
- पुस्तकं ही फक्त प्रेरणा देण्यासाठीच असतात.
दिदरो -
- वाक्ये ही टोकदार खिळ्यांप्रमाणे असतात. आपल्या स्मृतीवर ती कायमची
कोरली जातात.
चार्ल्स स्क्रिन्नर ज्युनि. -
- वाचन हे दुस-याचं मन वाचण्याचं साधन आहे. त्यामुळे तुमचीही
विचारशक्ती ताणली जाऊन विकसित होते.
हेन्री डेव्हिड थोरो -
- एखादं पुस्तक खरोखर खूप चांगलं असेल, तर मी त्यातून खूप काही
शिकतो. ते लवकरात लवकर वाचून संपवून, त्यानुसार जगायला कधी एकदा सुरुवात करेन असं होऊन जातं.
अॅड्लस हक्सले -
- वाचता येणा-या प्रत्येकात स्वत:ची उन्नती करण्याचं, जगण्याला अनेक
संदर्भ देण्याचं, पूर्णत्वाने रसरशीत आयुष्य जगण्याचे सामर्थ्य असतं.
थॉमस जेफरसन -
- मी पुस्तकांशिवाय जगूच शकत नाही.वाचन/१३२