या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्याम मनोहर -
- धर्मग्रंथ वाचताना बुद्धीचा वापर, बुद्धीचा प्रवास, मनाचा मोकळेपणा ह्या
शक्ती कमी प्रमाणात वापरल्या जातात. कारण धर्मग्रंथ वाचण्यात श्रद्धा ही प्रेरणा असते. तंत्रज्ञानावरचे ग्रंथ वाचण्यात बुद्धी खूप खर्च करावी लागते.
- तंत्रज्ञानावरची पुस्तके वाचण्याची प्रेरणा असते उपयुक्तता, तर अभिजात
कथात्मक वाङ्मय वाचण्यामागे प्रेरणा असते अस्तित्वाबद्दल कुतूहल.
- वाचकांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण आणि वाचनप्रक्रिया यावर संशोधन
होणे ही वाचन संस्कृतीची गरज आहे.
डॉ. सुधीर रसाळ -
- ज्या भाषिक समाजात वाचन करणे ही आपली नित्याची गरज आहे, असे
वाटणा-या व्यक्तींची भरपूर संख्या असते, त्या समाजाला वाचन संस्कृती आहे, असे समजले पाहिजे.
- वाचन संस्कृती आणि ज्ञान व वाङ्मय निर्मिती यांचे आंतरिक नाते असून
ते एकमेकांचे नियंत्रण करतात.
- मुद्रणाचे तंत्र अस्तित्वात आल्यावर आपल्या वाङ्मयीन संस्कृतीने
श्रवणयुगातून वाचन युगात प्रवेश केला.
- वाचन प्रक्रियेत वाचकाला श्रोत्यापेक्षा अधिक स्वातंत्र्य असते.
- मराठी भाषेत वाचन संस्कृती अविकसित रहाण्याचे मुख्य कारण आपल्या
संस्कृतीत वाङ्मयादी कलांना अतिशय गौण स्थान आहे. जोपर्यंत त्यांना महत्वाचे स्थान नाही, तोपर्यंत वाचन संस्कृती पूर्णपणे विकसित होऊ शकणार नाही.
- नुसती वाचक संख्या वाढून उपयोगाची नाही तर पुस्तके विकत घेऊन
वाचणा-यांची संख्या वाढणे म्हणजे समाज सुसंस्कृत होणे होय.
डॉ. बाळकृष्ण कवठेकर -
- अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनंतर सुशिक्षित, सुसंस्कृत माणसाची
वाचन ही चौथी मूलभूत गरज असते, असायला हवी.
वाचन १२९