या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
- आधुनिक शिक्षणाला खासगी वाचनाची (पूरक) जोड मिळाल्याशिवाय ते
सर्व निरूपयोगी ठरते.
डॉ. अरूण टिकेकर -
- काव्यवाचन, कथाकथन, नाट्यवाचन असे काही प्रकार वगळले तर वाचन
ही एकट्यानं, एकांतात करावयाची वैचारिक कृती असते.
- वाचकाची आवड-निवड मात्र सर्वस्वी त्याची पसंती असते.
- लेखक वाचकाला निर्मितीक्षम आनंद देत असतात.
- ग्रंथांपासून वाचनानंद मिळविण्याचा छंद सर्वश्रेष्ठ असतो.
- वाचनानंदाची चटक लागलेल्या वाचकाला अमर्याद आभाळाची देणगी
लाभते.
- आपल्या आवडी-निवडीच्या विषयात आवर्जून केलेले वाचन हेच खरे
वाचन होय.
- मनाचा ठाव घेणारं वाचन म्हणजे खरे वाचन.
- वाचनयोग्य वयात वाचनगुरू भेटला तर वाचनास दिशा मिळते आणि
आयुष्य वाया जात नाही.
- वाचन-गुरू काय वाचावे, कसे वाचावे आणि का वाचावे हे सांगतो.
- प्रत्येक पिढीने कोणत्या अभिजात वाङ्मय कृती वाचाव्यात, याचे मार्गदर्शन
करणारे ग्रंथ मिळत गेले तर अवांतर वाचनात, म्हणजे स्वत:चा मार्ग खाचखळग्यातनं काढत मार्गक्रमण करण्यात, त्या पिढीचा वाया जाणारा कितीतरी वेळ वाचेल.
- वाचकाच्या जीवनात ग्रंथसंग्राहक अवस्था गाठली जाणं ही त्या वाचकाची
परिपूर्ती म्हणावी.
- लोक वाचत नाहीत यावर माझा व्यक्तिगत विश्वास नाही.
- ‘वाचणारा आणि चांगलं काय नि वाईट काय सांगणारा समीक्षक हो
लेखक, प्रकाशक आणि वाचक यामधला खरा दुवा होय.
वाचन/१२८