पान:वाचन (Vachan).pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारण, माणूस जतनसाक्षर आहे. ५.१७ ई-रीडर्स (अॅप्स)

  • गुडरीडस्

अँड्रॉईड फोनसाठी उपयुक्त अॅप. हा वाचक गटाशी जोडला असून, जगातले सुमारे चार लाख वाचक या गटाशी जोडले गेले आहेत. १ कोटी संदर्भ पुस्तके, कोश, समीक्षा इत्यादी याच्याशी जोडले गेले आहेत.

  • कॉमिक्सॉलॉजी

हे मुलांसाठी खास तयार करण्यात आलेले वाचन संसाधन होय. यावर १ लाख स्वस्त वा मोफत कॉमिक्स, व्यंगपट, बालचित्रपट कथा इ. वाचता, पाहता येतात.

  • शेल्फी

ग्रंथ वाचकांसाठी पर्वणी ठरणारे हे साधन. यात पुस्तके डाऊनलोड करून वाचता येतात. ती स्वस्त, मोफत, किमती, नवी असे वैविध्य यात आहे. पुस्तक निवड, संग्रहण, नवप्रकाशित ग्रंथ माहिती इत्यादींसाठी उपयुक्त अॅप होय.

  • स्क्राइब

मासिक ९ डॉलर वर्गणीवर हे उपलब्ध, १० लाख पुस्तके उपलब्ध. यात कॉमिक्स, ध्वनिफिती (Audio Books) उपलब्ध आहेत. ६ कोटी लेख, संदर्भ, सांख्यिकी, आलेख, सर्वेक्षण, अहवाल पुरविणारे हे संसाधन संशोधकांना वरदान होय.

  • पोएट्री

काव्य रसिकांना विनोदी, आनंदी, विरह, प्रेम, आशावादी अशा सर्व भाव-विभावांच्या कविता वाचण्यास उपलब्ध करून देणारे साधन. अभिजात नि समकालीन दोन्ही प्रकारच्या कवितांचा अक्षरशः पूर वाहत असतो इथे.

  • ओव्हर ड्राइव्ह

जगातल्या ३० हजार नामांकित ग्रंथालयांना जोडणारे हे साधन म्हणजे ते तुम्हास त्या ग्रंथालयाचा सभासदच बनविते. ग्रंथालयातून पुस्तके घेतल्यासारखा सारा व्यवहार, वाचा नि परत करा.

  • स्टोरीविले

कथा वाचकांचे हे व्यासपीठ. २ डॉलर देऊन किंडलला जोडता येते. प्रत्येक आठवड्याला नवनव्या कथा हे अॅप पुरविते.

वाचन ११४