पान:वाचन (Vachan).pdf/११४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


ई-बुक रिडर्स सॉफ्टवेअर उपलब्ध असून, त्यात कॅरिबर, आयबुक, अॅडॉब अॅक्ट्रोबॅट, अॅडॉब रीडर, अॅडॉब डिजिटल एडिशन, मायक्रोसॉफ्ट रीडर, ब्लू फायर रीडर, गुगल प्ले बुक, नूक, बुकारी, किंडल, ओव्हरड्राइव्ह,बिलिओ, एफबी रीडर, इ. यांचा समावेश आहे.
५.१६.१ ई-बुकचे फायदे
१. ई-बुक आपण संगणक, लॅपटॉप, मोबाइल, किंडल, मॅक, टॅबलेट, स्मार्टफोन इ.वर वाचू शकतो.
२. अगणित पाने/मजकूर/आकृत्या/आलेख/दृक्-श्राव्य फिती इ. ई-बुकमध्ये समाविष्ट करू शकतो.
३. याची खरेदी, देवाण-घेवाण, संग्रहण, वाचन सुलभ असते.
४. ते क्षणार्धात जगातून कुठूनही बसल्याजागी मिळवून वाचता येते व तेही मोफत.
५. पर्यावरण संरक्षित असे हे साधन होय. झाडे कापावी लागत नाहीत,जसे कागदी पुस्तकासाठी ते आवश्यक असते.
६. कोणतीही माहिती, क्षणार्धात ई-बुकमुळे मूळ रूपात उपलब्ध होते.
७. ई-बुक ही आकाराने लघुकाय (Portable) , छोटी असतात. त्याला जागा लागतच नाही मुळी.
८. ई-बुक मुद्रित पुस्तकांसारखीच कुठेही, कशीही वाचता येतात.
९. ई-बुकद्वारे आपण संदर्भ शोध, संग्रह क्षणार्धात करू शकतो.
१०. ई-बुकची मुद्रित, ई-रूपात प्रत मिळणे क्षणार्धात शक्य असते.
५.१६.२ ई-बुकचे भविष्य

  ई-बुकचे भविष्य उज्ज्वल आहे, हे सांगायला कोण्या भविष्यवेत्याची गरज नाही. सन २०१६ मध्ये ‘प्यु न्युएस्ट डाटानी जाहीर केल्याप्रमाणे मुद्रित पुस्तके वाचकांच्या संख्येत घट होत आहे, हे स्पष्ट होते. तिकडे 'अॅमेझॉन'ची किंडलसदृश विक्री १२६० टक्क्यांनी वाढत आहे. हे लक्षात घेता मुद्रित पुस्तके राहतील केवळ स्मृती म्हणून. नवी पिढी ई-बुकच वाचेल. नवी पिढी ज्ञानसंग्राहक राहणार. ती चिकित्सक, समीक्षक, विश्लेषक असणार नाही. हे काम संगणक करेल. त्यामुळे माणसाच्या मेंदूमध्ये उत्क्रांती होईल. मुलांच्या वाचनावर परिणाम शक्य आहे. मुद्रित पुस्तके नष्ट होतील असे अजून ५०-१०० वर्षे तरी शक्य नाही. शेवटी ते वस्तुसंग्रहालयात नक्की भेटेल.

वाचन ११३