पान:मराठी रंगभुमी.djvu/२७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३७
भाग ३ रा.


एकाच रागांत अर्धा अर्धा तासभरबुद्धां गाऊ शकतो; एवढीच नव्हे तर, किंबहुना ती तितका वेळ गाइली तरच रागाचे खरें व पूर्ण स्वरूप व तसेच गवयाच्या ज्ञानाचें व गळ्याचे खरें कसब हें व्यक्त करितां येणे शक्य आहे. परंतु संगीत नाटकांत असे होणे शक्य नाही. कारण, संगीत नाटक फार तर चार साडेचार तास चालावयाच व तवढयात पांच चार पात्रांस मिळून ४०-५० पद्य म्हणणे भाग पडतें. त्याअर्थी गवयाचे पद्धतीने संगीत पात्रास गाणें शक्य नाही. तथापि, कोणत्याही पद्यांत रागाचे शुद्ध व शास्त्रसिद्ध स्वरूप ठेवणे व पात्रांची योग्यता संभाळून गाण्यांत जितका प्रौढपणा आणितां येईल तितका आणणे व ताना घेणें त्या शास्त्रीय नियमास धरून घेणे, इतक्या गोष्टींबद्लदची खबरदारी राखिली असतां संगीत हें शास्त्रीय ज्ञानी गवयांसही प्रिय होईल. वास्तविक गवयी गाण्यांतही क्रमाक्रमानें फेरबदल होत चालला आहे. म्हणजे पूर्वी गाणे म्हटलें म्हणजे ध्रुपद, ख्याल, टप्पा व फार झाले तर ठंबरी इथपर्यंत त्याची मजल असे, ती आतां गज्जल, पद, चतरंग व लावणी येथपर्यंत आली आहे ! तर अशा स्थितींत शास्त्रीय स्वरूप ठेवून व फक्त आलाप कमी करून व वेळ कमी करून जर संगीताची रचना होईल तर फारशी हानि न होतां नवन पद्धतींतील जो चटकदारपणा आहे तो कायम राहील. परंतु अलीकडे संगीतांत जा बाष्कळपणा वाढलेला आहे, तो तर सर्वांशी कमी झालाच पाहिजे. हल्लीचे संगीत म्हणजे सुधारकांत मागे एक गमत्या गृहस्थानसं वर्णिलेल्याप्रमाणे कविता ‘विदाळयाची' झाली आहे व सर्व संगीत लावणीपर झाले आहे. प्रस्ततच्या स्थितीत संगीताबद्दल कोणी तिरस्कार दाखविला तर तो यथायोग्यच आहे; परंतु वर दर्शविलेल्या तत्वांवर जर संगीताची सुधारणा होईल तर गायनकलेची अभिरुचि लोकांत उत्पन्न करण्याचे एक मोठेच साधन समाजास मिळालेसें होईल. कारण गवयी लोकांनी ही हें पक्कें लक्षांत ठेवावें कीं, त्यांच्या आढ्यतेले व त्यांच्या गर्विष्ठपणानें आजपर्यंत गायन गुरुमुखाच्या कुलुपक़िललित अटका-