पान:मराठी रंगभुमी.djvu/२७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३६
मराठी रंगभूमि.


सन्मान्य पुरुषांसंबंधाचीं नाटकें
केव्हां व कशीं करावीं ?

 सर्वात सन्मान्य असे जे पुरुष होऊन गेले ते कल्पनेतून काग दावर आले तर चालतील, पॅण कागदावरून रंगभूमीवर येणें हें फारसें इष्ट नाही. असे झाल्यानें नीच मनुष्यें वर जाण्याऐवजीं उदात्त स्वभावाचे नायक मात्र खाली येण्याचा संभव फार असतो. उत्तररामचरित्र ज्याप्रमाणे रसपरिपाकाच्या दृष्टोनें, त्याचप्रमाणें या दृष्टीनेंही दृश्य काव्य होण्यास योग्य नाहीं असें आम्हांस वाटतें. वरील दोन्ही मतांस अंशतः धरून चालावयाचें म्हटलें म्हणजे दोहोंपैकी एक मार्गाचा अवलंब करावा लागेल. एक तर मलबारीशेटनीं आपल्या प्रवासवृत्तांत वर्णिलेल्या येशू चरित्राप्रमाणे किंवा आर्नोल्डसाहेबांनी आपल्या निबंधांत वर्णीलेल्या हसनचरित्राप्रमाणे थोर परुषांचीं अद्रत कथानकें वर्षातून एखादे वेळ लोकसमूहाच्या डैटोसमोर आणावयाचीं; किंवा स्कॉटच्या कादंबयाप्रमाणे व्यक्ति एखादी प्रख्यात नायकरूपाने न आणतां आनुषंगिक म्हणून आणावयाची. असे केल्यानें मनाला मोठी चमत्कृती वाटून ती बराच वेळ टिकते. ग्रीक लोकांतला प्रख्यात मुत्सद्दी पेरैिक्लीज हा समाजांत फारच क्वचित् दृष्टीस पडत असे. कारण की, असें वागल्याने ज्या प्रसंगी तो दृष्टीस पडे त्या प्रसंगी त्याच्या वक्तृत्वाचा ग्रह उत्तम होऊन लोकमतावर चिरकालिक परिणाम होत असे. ही गोष्ट ज्याप्रमाणें मुत्सद्दी मनुष्यांनी त्याचप्रमाणें नाटककर्यानींही मनांत वागविण्यासारखी आहे.

कित्ता, एप्रिल १८९८.


संगीत नाटकांत कशी सुधारणा
झाली पाहिजे ?

 संगीत नाटकाचे गुणदोष पाहतांना प्रथम ही गोष्ट ध्यानांत ठेविली पाहिजे की, त्यांतील गाण्यांत उत्तम शास्त्रीय पद्धति ठेवतां येणार नाहीं, म्हणजे उत्तम गवयी एक एक चीज