पान:मराठी रंगभुमी.djvu/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८३
भाग १ ला.


पाण्याच्या बाटल्या पिऊन आंत गेल्यावर तें पाणी ओकून टाकण्याचा सरावच कांहीं दिवस केला होता व त्यांच्या सरावामुळे दारूचीं पिपेंच्या पिपें फस्त करणारे इसम कसे असतात याचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर चांगला उठत असे. रा. प्रधान हे या कंपनींत एक चांगले नांवाजलेले नष्ट असून निरनिराळ्या प्रसंगीं निरनिराळे चेहरे करण्यांत यांचा मोठा हातखंडा असे. ' धनुर्वात, , 'हटयोग, ' 'मद्यपियाचें प्राणोत्क्रमण ' इत्यादि प्रसंगांच्या चेह-यांचे यांचे जे फोटो पुणें येथील चित्रशाळेनें घेतले आहेत त्यावरून आमच्या ह्मणण्याची सत्यता कोणासही समजून येईल. याखेरीज बांच्या कंपनींत चिमणीची भूमिका घेणारे रा. निंबकर वगैर कांहीं इसम अभिनयाच्या कामांत चांगले नांवाजलेले होते.
 ' संमति कायद्याचें नाटक ” हें सामाजिक विषयावरील चवथें नाटक होय. स्त्रीचें वय बारा वर्षांचें झाल्याशिवाय पुरुषानें तिच्याशीं संबंध करूं नये असें क्रित्येक सुधारक पुढा-यांस वाटून इ. स. १८९१ मध्यें त्या बाबतींत सरकाराकडून कायदा करून घेण्याविषयीं त्यांनीं जारीनें प्रयत्न चालविले होते. उलटपक्षीं कायदा करून सरकारानें सामाजिक व धार्मिक गोष्टींत ढवळा-ढवळ करणें अत्यंत धोक्याचें आहे, असें जुन्या मताभिमानी लोकांस वाटून त्यांचेही उलट बाजूनें प्रयत्न चालले होते. पुणें, मुंबई येथें दोन्ही पक्षांच्या लोकांत चळवळ