पान:मराठी रंगभुमी.djvu/189

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७१
भाग २ रा.


शाकुंतलमध्यें आहेत हीं पद्येंही थोडींच आहेत असें ते दाखवितात! अशा वेगानें रागाचें स्वरूप लोकांच्या निदर्शनास न येतां लोकांना मात्र राग येऊन 'शू' 'शू' शब्दांच्या रूपानें त्याचें निदर्शन होतें. रा. गोरे यांस ताननें दगा दिला नाहीं तर त्यांचें काम बरें होतें. रा. नारायणबुवा हे कण्व व कृष्ण यांचीं कामें करतात व तीं बरीं होतात. कण्वाखेरीज त्या नाटकांत नारायणबुवा यांस दुसरीही किरकोळ एक दोन कामें देतात, पण त्यानें नाटकाचा भव्यपणा नाहींसा होतो. तरी बरें कीं, या कण्वाला कोळ्याबरोबर कलालाच्या दुकानांत पाठवून झोकांड्या देत नाहींत ! किर्लोस्कर मुंडळीला पात्रांची कमतरता नसून तिनें असें कां करावें हें समजत नाहीं. प्रियंवदेचें पात्र फार लहान असल्यामुळे तिच्या तोंडीं घातलेल्या शृंगाराचा त्यानें विरस होतो; व हाच प्रकार त्यांच्या सर्व नाटकांतून थोडाबहुत दिसून येतो. विदूषकाच्या फाजल चऱ्हाटास गांठ घातली पाहिजे. रुक्मिणीच्या महालांत नाच व प्रियंवदेस दोन तीन पद्यें ही नवी सुधारणा या मंडळीनें केली आहे. असो. ' जुनीं नाटकें आह्मीं सोडलीं नाहीत ' एवढे ह्मणून स्वस्थ न बसतां त्यांत सुधारणा करून तीं पूर्वीच्या तोडीस येतील असा प्रयत्न या मंडळीनें केला पाहिजे. मंडळीस ऐपत असल्यामुळे तिच्या हातून ही गोष्ट होण्यासारखी आहे. करितां पूर्वी या मंडळीनें जसा रागबद्ध संगीताचा प्रकार