पान:मराठी रंगभुमी.djvu/190

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२
मराठी रंगभूमि.


जारीनें प्रचलित केला तसाच आजमितीस तो बुडत चालल्यामुळे त्याचें पुनरुज्जीवन करण्याचें कामही तीच मंडळी आपले शिरावर घेईल अशी आह्मांस आशा आहे.

इतर नाटकें व पात्रे,

हल्लीं इतर नाटकमंडळ्या जीं जीं नाटकें करितात त्या सवीवर सविस्तर टीका करण्याचें प्रयोजन नाहीं. त्यांपैकीं बरींच अथवा बहुतेक सर्व पाटणकरी वळणांतलीं आहेत इतकें सांगितले असतां बस्स आहे. * या मंडळीं पैकीं लक्ष्मीकांतप्रासादिक मंडळींत नायकाचें काम करणारे रा. दत्तोपंत हलयाळकर, वाशिमकर मंडळींत नायेिकेचें काम करणारे रा. गोखले वगेरे कांहों इसम गायन


 * प्रो. श. म. परांजपे यांनीं 'कादंबरी' नांवाचें केलेलें नाटक मात्र पूर्वीच्या वळणाचें आहे. तथापि 'नाट्यकलाप्रवर्तक मंडळीनें प्रयोग करतांना अलीकडील लोकाभिरुचीच्या कढईत तळून त्याचा 'संगीत चिवडा' बनविला आहे! याखेरीज बाकीची बहुतेक नाटकें पाटणकरी वळणाचीं असल्यामुळे त्यांची नुसती याद् येथें देतों:-१ प्रबलयोगिनी, २ संतापशमन, 3 बलसिंहृतारा, ४ सत्यविजय, ५ युवतिविजय, ६ मुद्रिका, ७ वसंतचंद्रिका, ८ सीमंतिनी, ९ शालिनी, १० कामसेनरसिका, ११ प्रेमगुंफा, १२ विकल्पविमोचन, १३ समानशासन, १४ वीरत्रिविक्रम, १५ सत्यवती, १६ वत्सला, १७ कनक आणि कांता, १८ चंद्रकिंशोर, १९ अमरराज, २० अजितसिंहृकमला, २१ वीरसेनमंजरी, २२ प्रियाराधन, २३ तारा, २४ वीरांगना, २५ कुसुमचंपा, २६ इंदिरा, २७ रूपसेन, २८ लीलावती, २९ रत्नकांत, ३० वीरसेन, ३१ सैरंधी, ३२. सर्वस्वापहरण, इ. इ.