पान:मराठी रंगभुमी.djvu/168

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५०
मराठी रंगभूमि.


अजीर्ण होतें. यापेक्षां ते एक दोन ठिकाणींच आले असते तर त्यांची गोडी अधिक राहती. या नाटकांत ' आपण तुला शुभसेनास देणार ' असें प्रकोप ह्मणतो व शालिनी ' मला त्या शुभास न देतां शूरसेनास द्या ' अशी विनवणी करीत आहे, हा प्रसंग व त्यावेळचीं ' सदयहृदय अद्य करुनि विसरु नका माया- स्वकुलविमल समल करुनि विसरु नको विनया ' इ. पद्यप्रओतरें व ' जीवर मोठी तुमची प्रीति ' इ. रसभरित पद्ये, तसेच शूरसेन कारागृहांत सांपडून त्याला मारण्यासाठीं शुभसेन आला असतां त्यांचा झालेला संवाद व त्यांत शूरसेनाचें धैर्य, निग्रह वैगरे दिसून येणारे गुण या गोष्टी बहारीच्या साधल्या आहेत. याखेरीज शुंभसेन शालिनीस वश हो ह्मणून विनवीत आहे व ती त्याचा धिःकार करीत आहे. इ. कांहीं प्रसंगही चांगले साधले आहेत. शालिनी व शूरसेन यांच्या भाषणांतील शृंगार सुसंस्कृत असून जागजागीं जो विनोद आहे तोही भारदस्तपणाचा असल्यामुळे त्याचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर चांगला उमटतो. पात्रांचा अभिनय व गाणें यासंबंधानें पाहिलें तर रा. भाऊराव हे शूरसेनाचें काम करीत असून तें साधारणपणें बरें होई. ‘साधारणपणें बरें ह्मणण्याचें कारण असें कीं, त्यांच्या आवडीच्या चालींचीं पद्ये यांत नसल्यामुळे रागबद्ध संगीतांतील करामत करून दाखविण्याचा त्याचा मार्ग बराच खुंटला होता. दुसरें असें कीं, पदयें