पान:मराठी रंगभुमी.djvu/169

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५१
भाग २ रा.


दुर्बोध व कित्येक ठिकाणीं त्यांनाही न कळण्यासारखीं असल्यामुळे त्यांची जोरदार रीतीनें उठावणी होत नसे. रा. भाऊरावासंबंधानें आमचेंच मत तेवढे असें झालें नसून ' केसरी 'पत्राच्या ता. ९ आगस्ट १८९८ च्या अंक्रांत ' संगीतात्कर्षच्छु ' या सहीनें वीरतनयासंबंधानें जो पत्रव्यवहार प्रसिद्ध झाला आहे त्यांतही त्यानें अशाच प्रकारचे उद्वार प्रगट केले आहेत. तो ह्यणतो:- शूरसेनाची भूमिका करणारा गृहस्थ सुप्रसिद्ध आहे. परंतु हल्लीं त्याच गृहस्थाचें गायन व अभिनय पाहून मनाला केवळ असमाधान उत्पन्न होतें. कृत्रिम व किंचित् कर्कश झालेला आवाज, वेळीं अवेळीं सारखाच केलेला आक्रोश व फोडलेल्या किंकाळ्या, कारण नसतां शब्दांवर उगाच दिलेला जोर व दचकल्याप्रमाणें मध्येंच केलेली स्वराची उठावणी व बहुधा प्रसंग व रस न समजल्यामुळे केलेले अभिनय इ. गोष्टींच्या योगानें कै. आण्णांच्या तालमींतले तेच हे गृहस्थ होय किंवा नव्हे अशी शंका येते. ' असो; भाऊरावासारख्या कसलेल्या पात्राचीही जर या नाटकानें एवढी हबेलंडी उडविली तर इतर पात्रांची अवस्था कशी होत असेल, याची वाचकांनीच कल्पना करावी. तात्पर्य, संगीत व अभिनय या दृष्टीनें पाहिलें असतां या कंपनीकडून हें नाटक वठावें तितकें सरस वठलें नाहीं असेंच हाणावें लागतें. असें जरी होतें तरी कित्येक ठिकाणीं भाऊराव हे गाण्यानें लोकांचें मनोरंजन चांगलें