पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सेवांतर्गत शिक्षकांना घेता येण्यासाठी सोय.
 ४) एकात्मिक शिक्षण पदवी (Bachelor of Elementory Education) B. El. Ed. चार वर्षे कालावधी. बारावीनंतर प्रवेश, (सध्याच्या B.A. B.Ed. B. Sc. B. Ed. ला पर्यायी अभ्यासक्रम.)
 टीप : अनेक शिक्षण आयोगांनी B. Ed. पदवी चार वर्षे करण्याची शिफारस केली आहे, पण विद्यमान शिक्षणशास्त्र महाविद्यालय चालकांचा यास विरोध असल्याने ही महत्त्वपूर्ण शिफारस समझोता म्हणून विद्यमान B. Ed. दोन वर्षे करण्यात आले.
 ५) उच्चतर शिक्षण पदवी / पदव्युत्तर शिक्षण (Master of Education) दोन वर्षे कालावधी. M. Ed. उच्च माध्यमिक, शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमध्ये अध्यापनास पात्र
 टीप :
  १) काही विद्यापीठांतून M. A. (Education) दोन वर्षे कालावधीची सुविधा उपलब्ध
  २) नवे दोन वर्षांचे बी.एड. करणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असेल.
  ३) ही पदवी नियमित वा दूरस्थ/मुक्त केंद्रांतून करण्याची सोय.
 ६) शारीरिक शिक्षण पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षणक्रम - प्रत्येकी दोन वर्षे कालावधी D.PEd. / B.PEd. / M.P.Ed. क्रमशः प्राथमिक, माध्यमिक / उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन अध्यापनास पात्र.
 ७) कला शिक्षण पदविका (Diploma in Art Education) D.A.Ed. दोन वर्षे कालावधी - चित्रकला, शिल्पकला / संगीत, नृत्य, अभिनय अशा दोन शाखांत पदविका घेण्याची सोय / माध्यमिक, महाविद्यालयीन अध्यापनास पात्र
 ८) विशेष शिक्षण पदविका (Diploma in Special Education) D. S. Ed. अंध, मूक-बधिर, मतिमंद अध्यापनाच्या स्वतंत्र शाखेत पदविकांची सोय.
 ९) प्रगत शिक्षण पदविका / पदवी (Diploma/Digree inAdvance Education) शिक्षणशास्त्रांतील प्रगत पारंगततेसाठी विशेष संस्थांत विशेष अभ्यासक्रम. (संशोधनाधारित)
 १०) विद्यावाचस्पति पदवी (Doctor of Philosophy) - Ph.D.
 ११) विद्यापारंगत पदवी (Master of Philosophy) - M. Phil. संशोधनाधारित

नवे शिक्षण, नवे शिक्षक/७५