पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

क्रांतीच्या उंबरठ्यावरील अध्यापक शिक्षण


 शैक्षणिक वर्ष २०१५-१६ हे भारतीय शिक्षकांच्या सेवापूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या दृष्टीने क्रांतीचे वर्ष आहे. या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक ते पदव्युत्तर स्तरावरील शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम सर्वच स्तरांवर किमान दोन वर्षांचे करण्यात आले आहेत. रूढ डी.एड्., बी.एड्., एम.एड्, डी.पी.एड., बी.पी.एड, एम.पी.एड्.,ए.टी.डी. अभ्यासक्रम दोन वर्षांचे होत आहेत. काही आधी झाले होते. आता राष्ट्रीय स्तरावर सेवापूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रमात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जात असून ते स्तुत्य व स्वागतार्ह आहे. शिवाय आता या वरील पदविका, पदव्यांची नावेही नवी ठेवली जात आहेत. त्या पदविका, पदव्या कोणत्या इयत्ता/अभ्यासक्रमांना शिकवण्यास पात्र राहतील, हेही निश्चित करण्यात आले आहे. त्यांचा संक्षिप्त तपशील पुढीलप्रमाणे -

१) पूर्व प्राथमिक शिक्षण पदविका : (Diploma in Early Childhood
 Educaiton) D. E. C. Ed. दोन वर्षे कालावधी - बालवाडी अध्यापनास पात्र.
२) प्राथमिक शिक्षण पदविका : (Diploma in Elementary Education)
 D.El. Ed. कालावधी दोन वर्षे-इ. १ ली ते इ. ८ वी अध्यापनास पात्र.
 नव्या सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षण कायद्यानुसार Right to Education)
३) शिक्षण पदवी : (Bachelor of Education) - B. Ed. दोन वर्षे कालावधी.
 उच्च प्राथमिक (इ. ५ वी ते ८ वी), माध्यमिक (इ. ९ वी, इ. १० वी) आणि
 उच्च वा वरिष्ठ माध्यमिक (इ. ११, इ. १२ वी) अध्यापनास पात्र

 टीप : ही पदवी मुक्त विद्यापीठ / दूरस्थ शिक्षण केंद्रे इत्यादीमधून

नवे शिक्षण, नवे शिक्षक/७४