पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व समान संधीचे धोरण देऊन. आरक्षण हवे पण त्यापेक्षा समाजातील सर्व जात, धर्म वंचितांना समान सामाजिक न्याय त्यातून मिळायला हवा. ज्ञानरचनावादी शिक्षण हवे, पण समाजरचनेत समता, बंधुता, स्वातंत्र्य, जातीधर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही मूल्यांवर विश्वास वाढवणारे ते हवे, हे विसरता नये. आगामी वीस वर्षांचा समाज कसा असेल, ते कल्पून जर आपण शिक्षणाचा अभ्यासक्रम व आराखडा देऊ शकलो तर पिढीतील वैषम्य, बेरोजगारी, निराशा आपण दूर करू शकू.
 नवा ज्ञाननिष्ठ, बुद्धिनिष्ठ व विवेकी आणि विज्ञानवादी नागरिक घडवणारे शिक्षण नवे शिक्षण ठरेल. युनेस्कोने म्हटल्याप्रमाणे "Justify public trust and confidence and enhance the esteem in which the profession is held by providing quality education for all students." हा आपल्या शिक्षणाच्या आकृतिबंधाचा आत्मा असायला हवा, तरच आपण नव्या पिढीची आव्हाने स्वीकारणारे व अपेक्षा नि आकांक्षा उंचावणारे शिक्षण त्यांना देऊ शकू. त्यासाठी आपला जगाची स्पर्धा करणाच्या नव्या कौशल्ययुक्त शिक्षणाची मांडणी करायला हवी.

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/७३