पान:देशी हुन्नर.pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ७० ]

कोनाडे आहेत त्यांत चार चित्रें आहेत ह्मणजे एकेक चित्रें दोनदां दिलें आहे. कोनाड्याच्या बाजूला चौकोनी खांब काढून त्यांजवर कमानी काढिल्या आहेत. या कमानीची आंतली बाजू अर्धगोलारुती आहे व बाहेरून मधोमध टोंक आहे. दोन कमानीच्यामध्यें राहिलेल्या त्रिकोणाकृती जागेंत पंख पसरलेले बगळे आहेत. ह्या भांड्यावरील नक्षीकाम फारच सर्वोत्कृष्ट आहे."

 ह्या पंचपात्रीवर हल्लीं इंडियासरकाराची मालकी आहे. व ती लंडन शहरांतील साउथ केनसिंगटन नांवाच्या सर्वसंग्रहालयांत ठेवण्यांत आली आहे.

 सोन्यारुप्याचीं भांडीं हल्लीं या देशांत फार थोडीं होतात, कारण स्वदेशीय राज्यें कमी होत चाललीं आहेत. साहेब लोक नकस कामाचीं चांदीचीं भांडीं विकत घेतात. परंतु विलायतेस चांदीवर जकात द्यावी लागते त्यामुळें या धंद्यास मिळावें तितकें उत्तेजन मिळत नाहीं. ही जकात उठेपर्यंत नकस काम करणाऱ्या सोनारांचा धंदा चांगल्या रीतीनें चालेल असें आह्माला वाटत नाहीं.

 चांदीच्या नकस कामांत हल्लीं कच्छभूज येथील कारागिरांची मोठी कीर्ती आहे. काश्मीर प्रांतीं गंगाजमनी रुप्याचीं भांडीं होतात ह्मणजे चांदीच्या भांड्यावर नक्षी खोदून तिजवर सोन्याचा मुलामा देतात, परंत मधून मधून रुप्याचा भाग तसाच दाखविलेला असतो. नक्षींत बहुतकरून पत्तीच सोडविलेली असते. पाणी पिण्याची सुरई हें भांडें फार करून काश्मीरी सोनारांच्या दुकानांतून तयार मिळतें.

 अलिकडे इंग्रज लोकांकरितां चहाचीं भांडी, दारूचे प्याले वगैरे जिनसा होऊं लागल्या आहेत. सुरईचा आकार साहेब लोकांस फार पसंत आहे. या भांड्यावर सोन्याचे वेल खोदून त्यांत मधून मधून चांदी दिसती ठेविल्यामुळें त्यास फारच शोभा येते; व सोन्याचा रंग सुद्धां विशेष खुलून दिसतो ,हें नकस काम मोंगलबादशाहांनीं हिंदुस्थानांत आणलें असें ह्मणतात;तरी सर जार्ज बर्डवुड साहेब यांचें असें ह्मणणें आहे कीं काश्मीर प्रांतीच्या रहिवाशी लोकांच्या अंगीं असलेलें नैसर्गिक कौशल्य या हुन्नरास उंच पदास चढविण्यास कारण झालें यांत शंका नाहीं. प्याले व तबकें हीं सुरईप्रमाणेच सुरेख दिसतात. युवराज प्रिन्स ऑफ वेल्स हिंदुस्थानांत आले होते त्यावेळीं त्यांस काश्मीरच्या महारा-