पान:देशी हुन्नर.pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ७१ ]

जांनी एक तबक व सहा बशीप्याल्याचे जोड नजर केले त्यांजवरील काम फार सुबक आहे.

 काश्मीरी चांदीचें काम सुमारें सव्वा रुपया तोळ्यानें विकतें. मिन्याचें काम करणारे लोकच काश्मिरास चांदीची भांडी करतात; ह्यांत श्रीनगर येथें राहणार अहमदजू व हबिवजू हे प्रसिद्ध आहेत.

 पंजाबांत दिंल्ली, कपरथळा, जलंदर, अमृतसर आणि लाहोर या गांवीं सोन्यारुप्याची भांडीं करितात. मोठी भांडीं तयार करणारा दिल्लींत काय तो एकच इसम आहे. पंजाबांत गांवोगांव सोनार आढळतात, परंतु ते दागिने करण्याचे व सावकारीचें काम करण्यांत निमग्न असतात. सोन्यारुप्याची मोठीं भांडीं राजे लोकांस लागतात, परंतु तीं त्यांच्या पदरीं असलेले 'दरबारी' सोनारासच करावीं लागतात. साहेब लोकांकरितां ह्मणून पंजाबांत भांडीं तयार होत नाहींत, कोठें जरूर लागलीच तर "तलियार" या नांवानें प्रसिद्ध असलेले कासार लोक तेवढीं घडून देतात. पंजाबांत चांदीचीं भांडी चांगलीं होत नाहींत असें मेहेरबान पॉवेल साहेबांचेही ह्मणणे आहे. हे साहेब ह्मणतात " नेटिव लोकांच्या घरांत असलेली चांदीची भांडीं अगदींच विद्रूप असतात. नक्षी करून किंवा कांहीं भाग चकचकीत व कांहीं खडबडीत असा ठेवून भांड्यांस शोभा आणणें तद्वेशीयांस ठाऊकच नाहीं. चांदी शुद्ध असली व भांडें वजनानें जड असलें ह्मणजे त्यांस बस्स आहे." हेच साहेब काश्मीराहून पंजाबांत येऊन राहिलेल्या सोनारांच्या कामाची मोठी तारीफ करितात. अमृतसर येथे कांहीं असलें सामान तयार होत असतें. कपरथळ्यास कांचेच्या प्याल्यांवर सोन्यारुप्याचे नक्षी काढलेले पत्रे बसवून शोभा आणणारे एक दोन असामी आहेत.

 कच्छभूज येथील चांदीच्या कामाची बरोबरी कोठेंच होत नाहीं. हल्लीं साहेब लोकांत या भांड्यांस गिऱ्हाईक फार आहे. मुंबईंत सुद्धां चांदीचीं भांडीं होतात परंतु तीं कच्छ येथील कामासारखींच असल्यामुळें “कच्छ सिल्व्हर " या सदराखालींच विकतात. कच्छ भूज येथें उमरसी मावजी ह्मणून एक सोनार आहे त्यास तीस वर्षांपूर्वी चांदीच्या बिल्लयासुद्धां २०० रुपये बक्षीस मिळालें. हें बक्षीस लार्ड मेयो यांच्या स्मरणार्थ मुंबई सरकाराने ठेविलें आहे. त्यांत इयत्ता अशी आहे कीं, दरसाल जाहिरातींत प्रसिद्ध के-