पान:देशी हुन्नर.pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १०४ ]

देतात, त्यामुळें त्यांच्या कामांत सुधारणा होत चालली आहे. हे सर्व कारागीर एका हिंदु व्यापाऱ्याच्या मुठींत आहेत. तो त्यांस पैसे देतो व त्याजबद्दल त्यांचे कडून काम करवून घेतो. हस्तिदंतीचुडे, किंवा फण्या करणाऱ्या लोकांनीं टाकलेले ढलपे गोळाकरून त्यांचा या कामीं उपयोग करितात. शिसवी लांकडास अबनूस ह्मणण्याचीं पंजाबांत चाल आहे. याचाही कधीं कधीं उपयोग करितात. पितळेच्या पत्र्याच्या वेलबुटया कापून त्याही इशारपुर येथें लांकडांत बसवितात. तसेंच रंगारंगाचीं लांकडेंच घेऊन त्यांचीही वेलबट्टी कांहीं लोक काढूं लागले आहेत. लाहोर येथील हुन्नर शाळेंत मेस्त्री रामसिंग हा फार उत्तम काम करणारा आहे. त्रिनिअट येथें लांकडाचें कजावा ह्मणजे उंटावरील एका प्रकारचें खोगीर तयार करून त्याजवर कधीं कधीं घराच्या खिडक्यावर पितळेची नक्षी बसविलेली असते.
 हुशारपुरासारखें शिसवी काम करून त्याजवर मोत्याचे शिंपले बसविण्याची राजपुताना प्रांतांतील कोटा संस्थानांत एटवा गांवीं सुरवात झाली आहे. लंडन शहरांतील सन १८८६ च्या प्रदर्शनांत कोटा संस्थानांतून एक सुमारें चाळीस फूट लांब व बारा फूट उंच शिसवी पडदा पाठविण्यांत आला होता. त्याजवर असलें मोत्याच्या शिंपल्यांचें काम केलेलें होतें.

 वायव्यप्रांतांत नगीना गांवीं होत असलेलें अबनूसचें खोदीव काम चांगलें दिसावें ह्मणून कधीं कधीं त्याजवर मोत्याच्या शिंपल्याचें किंवा चांदीचें कोंदण काम करीत असतात; तथापि त्या गांवीं मैनपुरी प्रांतीं होत असलेल्या तारकशी कामाचीच मोठी प्रसिद्धी आहे. शिसवी लाकडाच्या पेटया कलमदानें वगैरे करून त्यांजवर पितळेची तार बसवून अनेक तऱ्हेची फारच सुबक वेलबुट्टी ठोकून बसवितात व ती पालिश करून साफ करतात. त्यामुळें ती सोन्याप्रमाणे चकाकून फार सुशोभित दिसते हा हुन्नर अगदी निकृष्ट दशेस येऊन पोचला होता, परंतु आलीकडे जिकडे तिकडे प्रदर्शनें होऊं लागल्यामुळें भरभराटीस येत चाललाआहे. मैनपुरी गांवीं लांकडावर तारकशीकाम करणारे सुमारे पस्तीस कारागीर आहेत. त्यांची काम करण्याची रीत अशी:-- लांकडाचं सामान तयार करून त्याजवर पेनसलीनें वेलबुट्टी काढन ती तीक्ष्ण चाकूच्या धारेनें खोदून काढतात. व त्या खोचीतून पितळेची तार भरून ती हातोड्यानें ठोकून बसवितात. या कामास मेहनत फार लागून वेळही पुष्कळ खर्च होतो. बाराइंच व्यासाची थाळी तयार करण्यास एका कारागिरास वीस