पान:देशी हुन्नर.pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १०३ ]

हस्तिदंत, सांबर शिंग, पितळ, चांदी, कथील किंवा मोत्याचे शिंपले, बसवितात. मुंबई, सुरत, बिलीमोरा आणि कच्छ याठिकाणीं चंदनाच्या पेट्या करून त्यांत हस्तिदंत, सांबर शिंग व कथील बसवितात. ही विद्या इराण देशांतून म्हणजे शिराज येथून सिंधप्रातांत येऊन तेथून सुरतेस व सुरतेहून मुंबईस आली आहे. पांढरा किंवा रंगविलेला हस्तिदंत, शिसवी लांकड, रक्त चंदन व कथलाच्या पट्या, ह्या एकाठिकाणीं बांधून तिकोनीं, चौकोनीं, पांच कोनीं, षड्कोनी किंवा वर्तुलाकाराच्या दांड्या करतात. ह्या दांडया बांधण्यापूर्वी पटयाच्या आंत मसाला घालून त्या एकमेकांस चिकटवितात. नंतर बारीक करवतीनें त्याच्या पातळ चवली सारख्या आडव्या चकत्या पाडतात. ह्या चकत्यांत रंगा रंगाच्या टिकल्या दिसुं लागतात. लांकडावर सिरस लागून त्यानें ह्या टिकल्या नंतर एकमेकांस लावून सारख्या चिकटवितात. असल्या कामास इंग्रजीत 'बांबेवर्कबाक्सिस ' असें नांव पडलें आहे.

 काठियावाडांत भावनगरास लांकडाच्या पेट्या करून त्यांजवर कोंदणांत पितळेची नक्षी बसवितात, व नवानगरयेथें मोत्याच्या शिंपाची नक्षी बसवितात.

 पंजाबांत हस्तिदंत व पितळेच्या पट्याबसविण्याची चाल आहे. हस्तिदंताची नक्षी कोंदणांत बसविलेली आहे असें लांकडी काम हुशारपुर येथे पुष्कळ होते. ह्या कामाचे पुणें प्रदर्शनांत एक गाडाभर नमुने आले आहेत. पितळेच्या पट्या बसविलेलें सामान जंग जिल्ह्यांत चिरिअट गांवीं होतें. हस्तिदंती काम सागाच्या लांकडावर विशेष शोभिवंत दिसावे ह्मणून त्यांत कधीं कधीं शिसवाच्या पट्याही बसवितात. हुशारपुर शहराजवळ गुलामहुसेनबासी म्हणून एक खेडें आहे, त्यांत असलें काम करणाऱ्या कारागिरांची पुष्कळच घरें आहेत. मेहरबान किप्लिंग साहेब यांचे मतें हा धंदा भरभराटीस येण्यास मेहरबान कोल्डस्ट्रीम साहेब कारण झालें असें ठरतें. पूर्वी हुशारपुरास कलमदानें, काठ्या, आरशाच्या चौकटी व चौकी नामक लहानसा चौरंग ह्याच कायत्या जिनसा तयार होत असत, व त्याही शिसवाच्या. पुढें कोल्डस्ट्रीम साहेबांनी टेबलें, कपाटें, दिवालगिऱ्या वगैरे पाश्चिमात्य पदार्थ करविण्याची सुरुवात केली; तेव्हां पासून हा व्यापार एकसारखा वाढतच चालला आहे. हुशारपुरचे कारागीर लाहोरास गेले म्हणजे तेथील हुनर शाळेचे मुख्य अधिकारी मेहरबान किप्लिंग साहेब हे त्यांस आरबी व देशी सामानाचे सुबक नमुने दाखवितात, व त्यांचे नकाशे उतरून